Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय इतर पर्यावरण

नदीत टाकलं जाळं, ओढल्यानंतर दिसली मगर

मगर हा असा प्राणी आहे, ज्याला दूरवर पाहूनच भीती वाटते. त्यामुळे मगरीला स्पर्श करणं तर दूरची गोष्ट. आता अशात विचार कर जर मासे पकडायला गेलेल्या व्यक्तीच्या जाळ्यात मगर अडकली तर? विश्वास बसणार नाही ना पण असं खरच घडलं आहे.

ऑस्ट्रेलिया : मगर हा असा प्राणी आहे, ज्याला दूरवर पाहूनच भीती वाटते. त्यामुळे मगरीला स्पर्श करणं तर दूरची गोष्ट. आता अशात विचार कर जर मासे पकडायला गेलेल्या व्यक्तीच्या जाळ्यात मगर अडकली तर ? विश्वास बसणार नाही ना पण असं खरच घडलं आहे.

ऑस्ट्रेलियामधील व्यक्तीसोबत घडला असाच प्रकार

ऑस्ट्रेलियामधील एका व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला. बोटीत बसून मासे पकडत असताना अचानक त्याच्या जाळ्यात मगर अडकली. ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन शहराजवळ मासेमारीचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. इथं मासेमारीसाठी येणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. गेल्या सोमवारी त्याच ठिकाणी ट्रेंट डी आपल्या कुटूंबासह बोटींग आणि फिशिंगचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचला.

नदीचे पाणी गढूळ होते, त्यामुळे मासे दिसत नव्हते. तरी ट्रेंटनं हुक अडकवून मासे पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे संपूर्ण कुटुंब बोटीत होते. अचानक जाळं जड झाल्याचे ट्रेंटला वाटले, म्हणून त्यानं जाळं बाहेर काढलं.

मोठा मासा अडकला म्हणून कुटुंबिय खूश

ट्रेंट डी आपली हळूहळू जाळं खेचू लागला. जाळ्यात मोठा मासा अडकला म्हणून कुटुंबिय खूश होते. मात्र जाळ्यातून अचानक मगर पाहून सर्वजण थक्क झाले. मगर जाळ्यात अडकल्यामुळे तीला बाहेर काढणार कसे असा प्रश्न होता. ट्रेंटनं जाळं काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तसे झाले नाही. अखेर मगरीनेच जीव वाचवण्यासाठी ते जाळं कुडतडून टाकलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा

Team webnewswala

ऑस्ट्रेलिया उंदरांमुळे त्रस्त; भारताकडे 5 हजार लिटर विषाची मागणी

Web News Wala

पेट्रोल दरवाढीवर E20 पेट्रोल चा उतारा

Web News Wala

Leave a Reply