Team WebNewsWala
राजकारण राष्ट्रीय

बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो

वॅक्सीनेशन कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो आहे.

बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो

Webnewswala Online Team – देशातील कोरोनाचा जोर ओसरत असला तरी राजकारण काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाहिये. आतापर्यंत वॅक्सीनेशन सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असायचा. मात्र आता वॅक्सीनेशन कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात 18-44 वयाच्या नागरिकांच्या वॅक्सीनेशन सर्टिफिकेटवर बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो आहे.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारनं कोरोना लस घेणाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रात पंतप्रधानांऐवजी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो वापरल्यानं राजकीय गदारोळ झाला होता. आता पश्चिम बंगाल सरकार त्याच धर्तीवर राज्यात कोरोना प्रमाणपत्र देताना पंतप्रधान मोदींच्या ऐवजी ममता बॅनर्जी यांचा फोटो लावलेला दिसत आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये राज्य सरकारने कोरोनाप्रतिबंधक लस घेणाऱ्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आहे. राज्य सरकार उत्पादकांकडून थेट लशींची खरेदी करत असल्याने आम्ही लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटा वापरण्याचा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला होता. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला आक्षेप घेतला होता. आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. मात्र आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावर लागणार असल्यानं दोन्ही पक्षांमधील वाद आणखी वाढणार आहे.

Web Title – बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो ( Mamata’s photo by deleting Modi’s photo on vaccination certificate in Bengal )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

सुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब

Web News Wala

म्हापशाचे सुपुत्र Paulo Travels चे मारियो परेरा यांचं कोरोनामुळे निधन

Team webnewswala

दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता : नितीन गडकरीं

Team webnewswala

Leave a Reply