Team WebNewsWala
राजकारण राष्ट्रीय

इंधन दरवाढी विरोधात ममता बॅनर्जी यांचा इलेक्ट्रिक दुचाकी प्रवास

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशात वाढत्या इंधन दराच्या विरोधात काढलेल्या मोर्चाच्या वेळी इलेक्ट्रिक स्कूटरवर स्वार झाल्या
इंधन दरवाढी विरोधात ममता बॅनर्जी यांचा इलेक्ट्रिक दुचाकी प्रवास

पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील दरात एक रूपया प्रतिलिटर कर कपात करण्याची घोषणा 

नबन्ना येथे पोचल्यानंतर बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजपाप्रणित सरकारवर जोरदार टीका केली. “आम्ही इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत आहोत. मोदी सरकार केवळ खोटी आश्वासने देतात. इंधनाच्या वाढत्या किंमती खाली आणण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यावर आणि आताच्या काळातील पेट्रोलच्या किमतींमध्ये असलेला फरक तुम्ही पाहु शकता”, असं त्या म्हणाल्या. मोदी आणि शहा देश विकत आहेत. हे सरकार लोकविरोधी असल्याचंही त्या पुढे म्हणाल्या.

बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे ९१.१२ रुपये आणि ८४.२० रुपये प्रतिलिटर झाली आहे. सर्वसामान्यांना थोडा दिलासा म्हणून पश्चिम बंगाल सरकारने रविवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलवरील दरात एक रूपया प्रतिलिटर कर कपात करण्याची घोषणा केली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मोदी सरकार विकणार आणखी 2 सरकारी बँका

Web News Wala

परराज्यातील मजूरांवरून बिहारी नेत्यांना रोहित पवारांचा टोला

Team webnewswala

अर्थव्यवस्थेला मोठा फटका, GDP 7.3 टक्क्यांनी घसरला

Web News Wala

Leave a Reply