Team WebNewsWala
Other अर्थकारण नोकरी पर्यावरण राजकारण व्यापार शहर

मालवण स्कुबा डायविंग परवानगी प्रक्रियेत MTDC ला विरोध

स्कुबा व्यवसाईकांच्या वतीने शासनाच्या धोरणाचे स्वागतच आहे. मात्र परवानगी प्रक्रियेत MTDC ला सहभागी करून घेण्याच्या निर्णयाला आमचा ठाम विरोध आहे

मालवण : सागरी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या स्कुबा डायविंगला परवानगी मिळवून देण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. स्कुबा व्यवसाईकांच्या वतीने शासनाच्या धोरणाचे स्वागतच आहे. मात्र स्कुबा डायविंग परवानगी प्रक्रियेत MTDC ला विरोध आहे. अशी भूमिका सिंधुदुर्गातील स्कुबा व्यावसायिकांनी स्पष्ट केली आहे.

स्कुबा डायविंग परवानगी प्रक्रियेत MTDC ला विरोध

दरम्यान, वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग व अन्य जलक्रीडा प्रकाराना जशी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड (एमएमबी) परवानगी देते. त्यावर नियंत्रण ठेवते तशीच परवानगी व नियंत्रण स्कुबा डायविंग प्रकारावरही एमएमबीने ठेवावे. आमचा कोणताही विरोध शासन धोरणाला राहणार नाही. असेही स्कुबा व्यावसायिकांनी स्पष्ट केले.

स्कुबा व्यवसाईकांच्या वतीने शासनाच्या धोरणाचे स्वागतच आहे. मात्र परवानगी प्रक्रियेत MTDC ला सहभागी करून घेण्याच्या निर्णयाला आमचा ठाम विरोध आहे

मालवण दांडेश्वर मंदिर येथे मालवण, देवबाग, चिवला, सर्जेकोट शिरोडा येथील स्कुबा व्यवसाईक प्रतिनिधींची बैठक सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करून पार पडली. यावेळी अन्वय प्रभू, दामोदर तोडणकर, राजेश नाईक, सुनील खवणेकर, मनोज मेथर, बाबली चोपडेकर, हेमंत रामाडे, राजन परुळेकर, फ्रान्सिस फर्नांडिस यासह सर्जेकोट संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांनी रुजवले सागरी पर्यटन 

स्थानिकांनी पुढाकार घेऊन 10 ते 12 वर्षापूर्वी मालवणात सागरी पर्यटन रुजवले. गेल्या काही वर्षात मालवण हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नकाशावर मालवणचे पर्यटन पोहचले. यात स्थानिकांची मेहनत व सहभाग सर्वाधिक आहे. येथील स्कुबा डायविंग पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. हा व्यवसाय परवानगी प्रक्रियेत आणण्यासाठी गेली काही वर्षे शासन स्तरावर खलबते सुरू होती. काही दिवसांपूर्वी शासनाने स्कुबा व्यावसायाला परवानगीसाठी धोरण निश्चित केले. यात काही अटी, शर्ती निश्चित आहेत. तर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड तसेच एमटीडीसी मार्फत परवानगी प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र या प्रक्रियेतील एमटीडीसीच्या सहभागाला आमचा ठाम विरोध असल्याचे स्कुबा व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे.

एमटीडीसीचेच अनेक प्रकल्प बंद

एमटीडीसीचे अनेक पर्यटन प्रकल्प बंद आहेत. कर्ली खाडीतील हाऊस बोट प्रकल्प, 10 बंद जेटस्की याचा बंद प्रकल्पात प्रामुख्याने समावेश आहे. एमटीडीसी अनेक प्रकल्प चालवण्यासाठी दिले आहेत. एकूणच एमटीडीसीचा कारभार आम्ही जवळून पहिला असून आमचा एमटीडीसीवर विश्वास नाही. त्यांच्या वतीने लादल्या जाणाऱ्या अटींची अंमलबजावणी जिल्ह्यातील स्थिती विचारात घेता शक्य नाही. त्यामुळे स्कुबा डायविंग परवानगी प्रक्रियेत एमटीडीसी नकोच अशी भूमिका स्कुबा व्यावसायिकांनी स्पष्ट केली.

मालवण शहराच्या प्रवेश द्वारावर पर्यटक गाडी सॅनिटीझर करून पर्यटक टेम्प्रेचर, ऑक्सीजन पातळी तपासली जाईल. पर्यटना दरम्यानही सुरक्षेची सर्व खबरदारी घेतली जाईल. असेही स्कुबा व्यावसायिकांनी स्पष्ट केले.जाचक अटीही रद्द व्हाव्यात

मालवणसह परिसरात केले जाणारे स्कुबा डायविंग हे किनाऱ्यापासून समुद्रात अगदी जवळ होते. काही ठिकाणी हे हाकेच्या अंतरावर असते. त्यामुळे स्कुबा प्रवासी बोटींना 15 एचपी क्षमते पर्यत इंजिन असते. मात्र नव्या धोरणात 60 एचपी क्षमता इंजिन ही अट जाचक आहे. तर अन्य काही जाचक अटी आहेत. त्याबाबत आक्षेप हरकती नोंदवण्यास 7 ऑक्टोबर पर्यत मुदत असून आम्ही व्यवसाईक त्याबाबत लेखी हरकती नोंदवणार आहोत असे अन्वय प्रभू, दामोदर तोडणकर यांनी स्पष्ट केले.

हॉटेल सुरू केली ; सागरी पर्यटनही सुरू व्हावे

कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेला हॉटेल,लॉज व्यवसाय अनलॉक प्रक्रियेत पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र अद्याप सागरी पर्यटन व अन्य करमणूक प्रकाराना परवानगी देण्यात आली नाही. गेले आठ महिने बंद असलेला हा व्यवसाय सुरू करून या व्यवसायावर अवलंबून असलेल्याना पुन्हा रोजगार उपलब्द व्हावा. अशी मागणीही या बैठकीच्या निमित्ताने करण्यात आली.

स्कुबा व्यवसाईकांच्या वतीने शासनाच्या धोरणाचे स्वागतच आहे. मात्र परवानगी प्रक्रियेत MTDC ला सहभागी करून घेण्याच्या निर्णयाला आमचा ठाम विरोध15 ऑक्टोबर पासून आम्ही सज्ज

दरवर्षी नवा पर्यटन हंगाम 1 सप्टेंबर पासून सुरू होतो. मात्र कोरोनामुळे सगळेच ठप्प आहे. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले अनेकजण आर्थिक संकटात आहेत. तरी आता टप्प्याटप्प्याने सेवा सुविधा सुरू होत आहेत. त्या धर्तीवर सागरी पर्यटनास परवानगी मिळावी. आम्ही 15 ऑक्टोबर पासून नव्या पर्यटन हंगामासाठी सज्ज आहोत. कोरोना खबरदारी सर्व नियमांचीअंमलबजावणी केली जाईल.

मालवण शहराच्या प्रवेश द्वारावर पर्यटक गाडी सॅनिटीझर करून पर्यटक टेम्प्रेचर, ऑक्सीजन पातळी तपासली जाईल. पर्यटना दरम्यानही सुरक्षेची सर्व खबरदारी घेतली जाईल. असेही स्कुबा व्यावसायिकांनी स्पष्ट केले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राहुल बजाज यांचा बजाज फ़ायनान्स च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Team webnewswala

नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी स्थापनेसाठी सरसावले

Web News Wala

कोल्हापुरी चप्पल आता अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध

Team webnewswala

Leave a Reply