Team WebNewsWala
Other अर्थकारण तंत्रज्ञान व्यापार शहर

जिओचे मोठे गिफ्ट करा जिओ फोन मधून यूपीआय पेमेंट

टेलिकॉम सेक्टरमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता Jio डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंत भारतात 10 कोटी स्मार्टफोन आणत फोन मार्केट वर कब्जा करण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओ ने आपल्या जिओ फोन युजर्सला मोठे गिफ्ट देत यूपीआय पेमेंट सपोर्ट देणे सुरू केले आहे. जिओ फोन मध्ये स्मार्टफोन यूजर्सप्रमाणे यूपीआय पेमेंट करू शकणार आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या फीचरचे टेस्टिंग सुरू होते.

बीजीआरच्या रिपोर्टनुसार जिओ फोन युजर्सला यूपीआयचा सपोर्ट जिओ पे अ‍ॅपमध्ये मिळत आहे. सध्या हे फीचर्स ठराविकच युजर्सला मिळाले असून, हळूहळू अन्य लोकांना देखील याचा सपोर्ट मिळेल. जिओ पे मध्ये यूपीआयच्या सपोर्टसाठी जिओने एनपीसीआयसोबत भागीदारी केली आहे.

जिओ पे मध्ये यूपीआयचा सपोर्ट मिळणे मोठी गोष्ट आहे. कारण फीचर फोनमध्ये डिजिटल पेमेंट अवघड आहे, मात्र जिओने हे करून दाखवले. कंपनीने जिओ फोनला 2017 मध्ये लाँच केले होते. हा एक 4जी फीचर फोन आहे. युजर्स आता जिओ पे द्वारे युजर्सच्या नावावर क्लिक करून पैसे पाठवू शकतात, बिल भरू शकतात आणि मोबाईल रिचार्ज देखील करू शकतात.

नक्की वाचा >>
बैरूत जखमींसाठी मिया खलिफा ने जमवला ७४ लाखांचा निधी
भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल
नैराश्यावर करा मात एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात ऑनलाइनच

Web News Wala

झाडाखाली शाळा घेणाऱ्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार

Team webnewswala

कोपरी पुल कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रीचे विशेष ब्लॉक

Web News Wala

Leave a Reply