Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय ऑटो व्यापार

महिंद्राची स्कूटर फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात

महिंद्राची तीनचाकी स्कूटर मेट्रोपोलिसचा फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात समावेश. या महिन्याच्या सुरुवातीलाच ही स्कूटर फ्रान्समध्ये लाँच

महिंद्रा ग्रुपच्या मालकीची फ्रान्सची कंपनी प्यूजो मोटारसायकल्सची (Peugeot Motocycles) महिंद्राची तीनचाकी स्कूटर मेट्रोपोलिसचा फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ही तीनचाकी स्कूटर फ्रान्समध्ये लाँच झाली आहे. याआधी प्यूजो ई-ल्यूडिक्स ही स्कूटर देखील फ्रान्स राष्ट्रपतींच्या ताफ्याचा भाग आहे.

याबाबतची माहिती देणारे ट्विट रिट्विट करत आनंद महिंद्रांनी लिहिले की, आपण नक्कीच चांगल्या दिशेने जात आहोत… प्यूजो मोटारसायकल्स.. महिंद्रा राइसची कंपनी.

या वर्षीच्या सुरुवातीला मे 2020 मध्ये अधिकृत लाँचनंतर, प्यूजो मेट्रोपोलिस स्कूटरचा चीनमधील ग्वांगडोंग सिटी पोलीस ताफ्यात देखील समावेश करण्यात आला होता. त्याचवेळी आनंद महिंद्रांनी ट्विट करत फ्रान्स सरकारला या स्कूटरला आपल्या ताफ्यात समावेश करावा असे म्हटले होते. याशिवाय लवकरच भारतात देखील कमी किंमतीत ही स्कूटर उपलब्ध करून देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मेट्रोपोलिस स्कूटर लवकर भारतात उपलब्ध होईल, मात्र अद्याप भारतात तीन-चाकी स्कूटरबाबत एवढी लोकप्रियता दिसून येत नाही.

स्कूटरबद्दल सांगायचे तर मेट्रोपोलिसचा लूक दमदार आहे. यात एलईडी हेडलॅम्पस आणि एलईडी डीआरएलएस देण्यात आले आहे. स्कूटरला कंपनीचा लोगो असलेली काळा रंगाची विंडस्क्रिन देण्यात आलेली आहे. इतर तीनचाकी स्कूटरच्या तुलनेत या स्कूटरचा लूक अधिक आकर्षक आहे. प्यूजो मेट्रोपोलिसमध्ये 400सीसी पॉवरट्रेन एलएफई इंजिन देण्यात आले आहे, जे 35बीएचपी पॉवर आणि 38एनएम पीक टार्क जनरेट करते.

दरम्यान, महिंद्राने ऑक्टोंबर 2019 मध्ये प्यूजो मोटारसायकल्स ही कंपनी खरेदी केली होती. लवकरच भारतीय बाजारात देखील ही कंपनी दाखल होण्याची शक्यता आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भारतीय वंशाच्या Kamala Harris अमेरिकन उपाध्यक्षपदाच्या उमेदवार

Team webnewswala

फेसबुक बंद करणार आपले हे लोकप्रिय अ‍ॅप

Team webnewswala

सोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर

Web News Wala

Leave a Reply