Other सिनेमा

मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत महेश मांजरेकर

Mahesh Manjarekar

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मनोरंजन उद्योगाला जोरदार फटका बसला आहे. अनेक मोठे चित्रपट लांबणीवर गेले आहेत. अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत मराठी मनोरंजनसृष्टी कुठे उभी आहे ? यावर चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मराठी प्रेक्षकांनाच आपले चित्रपट पाहायचे नाहीत, त्यामुळे मराठी सिनेसृष्टी आर्थिक कोंडीत सापडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महेश मांजरेकर संतापले मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मराठी

मनोरंजनसृष्टीतील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. ते म्हणाले, “करोना आणि लॉकडाउनमुळे मराठी सिनेसृष्टीची आर्थिक स्थिती फारच बिकट झाली आहे.

मराठी सिनेसृष्टीची स्पर्धा हिंदी सिनेसृष्टीशी

सध्या आपल्याकडे वेट अँड वॉचचाच पर्याय उपलब्ध आहे. सिनेमागृह सुरु होतील, प्रेक्षक येऊन चित्रपट पाहतील. आणि परिस्थिती सुधारेल अशीच अपेक्षा आपण करु शकतो. आपली स्पर्धा हिंदी सिनेसृष्टीशी आहे.

पण या स्पर्धेत आपण मागे पडत चाललो आहोत. कारण मराठी प्रेक्षकच आपल्या चित्रपटांना प्रतिसाद देत नाहीत. आपल्या प्रेक्षकांचा कल मराठी चित्रपटांऐवजी हिंदी पाहण्याकडे अधिक आहे.

महेश मांजरेकर संतापले मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत

त्यामुळे या करोनाच्या फटक्यातून बॉलिवूड लवकर बाहेर पडेल. पण मराठीचं काही सांगता येत नाही. तसंच आता OTT प्लॅटफॉर्मवर देखील हिंदी चित्रपट आणि मालिकांचीच चलती आहे.

OTT प्लॅटफॉर्मवर पाश्चात्य चित्रपटांनी व्यापली प्रादेशिक भाषांसाठी जी जागा

त्यात प्रादेशिक भाषांसाठी जी जागा होती ती पाश्चात्य चित्रपटांनी व्यापून टाकली, त्यामुळे तिथेही मराठी मनोरंजन क्षेत्र काहीसं मागे पडल्याचं दिसत आहे. ही परिस्थिती लॉकडाउन आणि करोनामुळे आणखी बिकट होत चाचली आहे.” अशा भावना महेश मांजरेकर यांनी व्यक्त केल्या

बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नगरसेविका रुचिता मोरे यांच्यातर्फ़े महिलांना ऑटोरिक्षा वाटप

Team webnewswala

लॉकडाऊन च्या काळात कास पठारावर दुर्मीळ फुलांचा बहर

Team webnewswala

या होळीला पुरणपोळी चे 8 प्रकार नक्की करा ट्राय

Web News Wala

Leave a Reply