राष्ट्रीय व्यापार

द्राक्ष, आंबा निर्यातीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

कोरोनाकाळात भारतातून ५८ हजार ७६ कोटींची शेतमालाची निर्यात झाली. त्यामध्ये द्राक्ष आणि आंबा निर्यातीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

द्राक्ष, आंबा निर्यातीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर

Webnewswala Online Team – कोरोनाकाळात म्हणजे एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात भारतातून ५८ हजार ७६ कोटींची फळफळाव व शेतमालाची निर्यात झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचा १३ हजार ८७७ कोटींचा असून, द्राक्ष आणि आंबा निर्यातीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

देशातील शेतमाल परदेशात पाठवण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा सर्वाधिक वापर महाराष्ट्राने केला. आतापर्यंत या यंत्रणेला राज्यातील ८० हजार शेतकरी कृषी विभागाने जोडले आहेत. राज्यानेही स्वतंत्र निर्यात कक्ष तयार केला आहे. फळे व भाजीपाल्यांसाठी ४५ प्रकारच्या संगणकीय यंत्रणा तयार आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना निर्यातक्षम माल तयार करण्यापासून ते परदेशी बाजारपेठ शोधण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत केली जाते. या माध्यमातूनच कोरोनाकाळात राज्याने २ हजार २५० कोटींची द्राक्ष निर्यात केली.

देशाची द्राक्षांची एकूण निर्यात २ हजार २९० कोटी रुपयांची आहे. राज्याचा त्यातला वाटा ९८.२५ टक्के आहे. केळी आणि आंबा निर्यातीतही महाराष्ट्र आघाडीवर असून अनुक्रमे ४५५ व १९२ कोटींची निर्यात झाली आहे. देशात या दोन्ही फळांमध्ये राज्याचा वाटा अनुक्रमे ७३.८६ व ८९.७२ टक्के आहे. निर्यात कक्षातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फळं व भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्राला मोठा वाव आहे.

द्राक्ष वगैरेसाठी प्लॉटची नोंदणी करून मागणी करणारे देश सांगतील त्याप्रमाणेच, त्याच औषधांची फवारणी करावी लागते. या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी सवयीच्या करून घेतल्या, तर महाराष्ट्राला शेतमाल निर्यातीत अजून भरपूर वाव आहे. आमचा तोच प्रयत्न आहे
गोविंद हांडे, राज्य सल्लागार, निर्यात कक्ष

Web Title – ‘द्राक्ष, आंबा निर्यातीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर ( Maharashtra ranks first in the country in export of grapes and mangoes )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Petrol and Diesel Price 32 दिवसांत 18 व्या वेळेस इंधन दरवाढ

Web News Wala

नोकरी शोधणाऱ्यांसाठी google चे नवीन app Kormo Jobs

Team webnewswala

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात, पण मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

Web News Wala

Leave a Reply