Team WebNewsWala
क्राईम समाजकारण

महानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवडकर

महानेट प्रकल्पात ठेकेदारांचे अनधिकृत कामाचे जाळे – समीर शिरवाडकर

Webnewswala Online Team – राजापूर तालुक्यातील सद्या महानेट प्रकल्पाचे काम सुरू आहे. ह्या प्रकल्पाचा ठेका श्री.लक्षणराव सूर्यवंशी यांच्या दर्शन एंटरप्राइज आणि सिलिकॉन केयर या कंपनीकडे असल्याचें समजते. सदर काम सागवे विभागात सुरू आहे. शासनाच्या महाआयटी या विभागाने कोणत्याही शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनी ताब्यात घेतल्या नाहीत असे असताना सुद्धा वरील कंपनीने राजापूर तालुक्यातील आपले काम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनी शेतकऱ्यांना न विचारता त्यांची कोणतीही पूर्वकल्पना न घेता राजरोसपणे अनधिकृत पणे जमिनी ताब्यात घेत खड्डे मारून आणि पोल टाकून जमिनी ना पीक करून मोठे नुकसान केले आहे.

महानेट प्रकल्प चे काम करणारे ठेकेदारांची खाजगी जमिनीत अनधिकृत काम केल्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश

शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती ला केराची टोपली दाखवली आहे. वारंवार संबंधीत विषयाच्या प्रशासन विभागाला या बाबत पाठपुरावा करीत असतो. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कसाठी आणि त्यांना त्यांच्या जमीनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय राजापूर, तहसिल कार्यलाय राजापूर, महावितरण उभाग, सा.बा.विभाग रत्नागिरी आणि राजापूर आणि सर्व ग्रामपंचायत याना वेळोवेळी विचारणा करीत होतो आणि त्याचा पाठपुरावा करीत होतो, आणि म्हणून माझा आवाज बंद करणेसाठी संबंधित ठेकेदार यांनी माझ्यावर काही दिवसांपा पूर्वी आरोप सुद्धा केले होते.परंतु सत्याचा आवाज कधी बंद होत नाही याची त्याला प्रचिती आली असेलच बहुदा…सामान्य आणि गरीब शेतकऱ्यांना त्यांना त्याच्या मोबडल्यापासून वंचित घेऊज त्याचा फायदा स्वतः आणि त्याची काही माणसांना स्वतःमधून आपल्याच खिशात घालून घायचा डाव मी कदापि होऊ देणार नाहीत. यामध्ये काही ग्रामपंचायत मधील सरपंच सुद्धा सामील आहेत, करण या ठेकेदार चे दौरे नेहमी त्यांचा घरी की ऑफिस मध्ये असतात.
समनधित काम सुरू असताना मी स्वतः जिल्हा प्रकल्प व्यवस्थपक माहिती तंत्रज्ञान विभाग जिल्हाधिकारी कार्यलाय रत्नागिरी श्री. यशवंत चौगुले साहेब यांना दि.१-फेब्रुवारी-२१ रोजी भेटून सदर प्रकलाची माहिती घेण्यासाठी गेलो ,तसेच त्यांना तसं पत्र सुद्धा दिले आहे.आणि संबंधित कंपनी लोकांना न विचारता त्यांच्या जमीनी ( खाजगी) भु-संपादन न झालेल्या आपल्या ताब्यांत घेऊन त्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता शेतकऱ्यांच्या खाजगी जमीनीत अनधिकृत पणे खड्डे काढुन आणि तयार अनधिकृत पणे पोल टाकत आहेत, आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना त्याच्या जमीनीचा मोबदला त्यांना दरमहा मिळावा आणि चौगुले साहेबांनी खाजगी जमिनीत खड्डे किंवा पोल टाकणे हे अनधिकृत असल्याचे सांगितले.

समिर विजय शिरवडकर
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र- राज्य सचिव

सदर, महानेट संबंधित माहिती माहिती तंत्रज्ञान विभाग मुंबई कडून उपमहाव्यवस्थापक – महानेट – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई महाराष्ट्र ने सुद्धा महानेट प्रकल्पाचे काम करणेसाठी कोणतीही खाजगी जमीन ताब्यात घेतल्या नाहीत. असे पत्र क्र. MH-IT/OW/0321/00795 दि.२५/३/२१ असल्याचे ही समीर शिरवाडकर यांनी सांगितलं आहे.त्याच प्रमाणे या पत्रात समनधित विभागाचा ( सा.बा.उपविभाग राजापूर) व महावितरण राजापूर ) एकत्रित सर्व्ह केला आहे असे नमूद आहे परंतु सा. बा.उपविभाग राजापूर यांचे पत्र क्र. जा.क्र. आर ऐ जे/पी बी/ माहिती अधिकार/-१०२ दि.११/०२/२१ मध्ये साइड पट्टीवरील पोल काढुन टाकण्याचे आदेश देऊन या कार्यलाय मार्फत एकत्रीत स्वरूपाचा पाहणी अहवाल झालेला नाही. तसेच महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी मर्यादित – महावितरण जा.क्र. उपकाअ/ रा जा-१/ ता.२२७ दि. २/३/२१ मध्ये पाहणी अहवालाची कोणतीही प्रत नाही. यावरून संबंधित कंपनी आणि मॅनेजर किती अनधिकृत पणे काम करीत असलेच दिसून येत. संपूर्ण अनधिकृत कामे,आणि शेतकऱ्यांचे मोबदला आपल्या खिशात घातला आहे.
सदर, खाजगी जमिनी बाबत आणि शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यलाय रत्नागिरी, सा.बा.बांधकाम विभाग रत्नागिरी, तहसिलदार राजापूर, उपविभागीय कार्यलय राजापूर, सा. बा.बांधकाम उप विभाग राजापूर, महावितरण राजापूर या सर्व कार्यलय मध्ये पत्रव्यवहार केला चे शिरवाडकर यांनी सांगितले आहे. दळे विभागात आपल्या जमीनी शासन आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता जमिनी ताब्यात घेत आहेत परंतु आम्हाला त्या जनिमीचा मोबदला (दरमहा) मिळावा अन्यथा खड्डे बुजवावे अशा आशयाचे पत्र संबधित शेतकऱ्यांनि दिले आहे. शेतकरी स्वतः संबधित कंपनीच्या मॅनेजर ला फोन करून कळवल्याचे ही यावेळी शिरवडकर यांनी सांगितले आहे. ही सर्व अनधिकृत कामे लपविण्यासाठी दर्शन एंटरप्राइज आणि सिलिकॉन केयर या कंपनीने खाजगी जमिनीत केलेल्या अनधिकृत कामाची चौकशी करण्याचे आदेश, जिल्हा प्रकल्प माहिती तंत्रज्ञान विभाग जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांनी पुढील कार्यवाही साठी मुख्य कार्यालय महाआयटी कडे दिले आहे.

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मोबाईल वापरून घरबसल्या मिळवा LPG सबसिडी

Web News Wala

पर्यावरणाला घातक माशांची मांगूर पैदास

Web News Wala

जन्म-मृत्यू दाखला आता ऑनलाइन पालिकेने घेतला निर्णय

Team webnewswala

Leave a Reply