Team WebNewsWala
राष्ट्रीय

LPG Gas booking चे नियम बदलणार

सिलेंडरच्या बुकिंगबद्दल लवकरच नवा नियम (new rule) येणार आहे. आता आपल्याला फक्त आपल्याच गॅस एजन्सीकडून (gas agency) गॅस बुक करण्याची गरज नाही,

LPG Gas booking चे नियम बदलणार

Webnewswala Online Team – LPG Gas booking बद्दल लवकरच नवा नियम (new rule) येणार आहे. आता आपल्याला फक्त आपल्याच गॅस एजन्सीकडून (gas agency) गॅस बुक करण्याची गरज नाही, तर इतर एजन्सीकडूनही (other agencies) आपण बुकिंग करू शकाल. गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरपासून काही नवे नियम लागू झाले होते ज्यात सिलेंडरचे बुकिंग ओटीपीद्वारे (OTP) करण्यात आले होते जेणेकरून बुकिंगची यंत्रणा (booking system) अधिक सुरक्षित (secure) आणि चांगली (proper) होईल. आता पुन्हा एकदा एलपीजी बुकिंग आणि डिलिव्हरीची यंत्रणा (delivery system) सुलभ करण्याची तयारी केली जात आहे.

LPG Gas booking चे नियम बदलण्याची तयारी

सरकार आणि तेल कंपन्या यार विचार करत आहेत की ग्राहकांसाठी बुकिंग आणि रीफिलची पूर्ण प्रक्रिया कशी सोपी आणि वेगवान करता येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी जेव्हा एलपीजीच्या नव्या नियमांबद्दल चर्चा सुरू होती तेव्हा यावरही विचार केला गेला होता की एलपीजी रीफिलसाठी ग्राहकांना फक्त एकाच एजन्सीवर अवलंबून राहावे लागू नये. त्यांच्या नजिकच्या इतर एजन्सीकडूनही त्यांना सिलेंडर रीफिल करता यावा. यासाठी सरकार आणि तेल कंपन्या एक इंटिग्रेटेड मंच तयार करतील.

कोणत्याही एजन्सीकडून करता येणार एलपीजी रीफिल ?

अनेकदा ग्राहकांना आपल्याच एजन्सीकडे बुकिंग केल्यानंतर रीफिलसाठी बराच काळ वाट पाहावी लागते, कारण ही एजन्सी त्यांच्यापासून दूर अंतरावर असते जिथून डिलिव्हरी होण्यास वेळ लागतो. आता यावर विचार चालू आहे की ग्राहकांना कोणत्याही गॅस एजन्सीकडून रीफिल करून घेता येईल. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्या मिळून एक खास मंच तयार करत आहेत. सरकारने तेल कंपन्यांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

पत्त्याच्या पुराव्याविना मिळणार एलपीजी सिलेंडर

याशिवाय आपल्याला आता 5 किलोचा छोटू सिलेंडर निवासाचा पुरावा न देताही मिळणार आहे. जे लोक प्रवासात असतात त्यांना या सिलेंडरचा फायदा होतो. त्यांना निवासाचा पुरावा देताना अडचणी येतात. त्यांच्यासाठी ही नवी व्यवस्था फायदेशीर ठरणार आहे. हा छोटा सिलेंडर देशभरात कोणत्याही ठिकाणी रीफिल करता येणार आहे. याचा अर्थ आपण पेट्रोल पंपावरूनही हा सिलेंडर रीफिल करू शकता.

Web Title – LPG Gas Booking चे नियम बदलणार (LPG Gas booking rules will change )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

सुप्रीम कोर्टानं सरकारकडे मागितला कोरोना लसींचा हिशोब

Web News Wala

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आसाम हादरले, इमारतींना तडे

Web News Wala

कोरोनामुळं आरोग्य सेवकाचा मृत्यू झाल्यास 48 तासात 50 लाख मिळणार

Web News Wala

Leave a Reply