Team WebNewsWala
सिनेमा

सुशांतच्या आयुष्यावर आधारित Suicide or Murder चा फर्स्ट लूक रिलीज

look-release-of-suicide-or-murder-based-on-sushants-life

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे ‘Suicide or Murder : एक स्टार खो गया’ असे नाव असणार आहे.

टीक-टॉक स्टार सचिन तिवारी या चित्रपटात सुशांतची भूमिका साकारणार आहे. टीक-टॉक स्टार सचिन तिवारीचे फोटो सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हुबेहुब सुशांतसारखाच सचिन दिसतो,

look-release-of-suicide-or-murder-based-on-sushants-life

असा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येत होता. त्यामुळे सुशांतच्या आयुष्यावर आधारीत असणाऱ्या या चित्रपटात सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.

सुशांतच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची निर्मिती विजय गुप्ता करणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु असून सप्टेंबरपासून शुटिंग सुरु केले जाऊ शकते. या चित्रपटाचे शुटिंग मुंबई आणि पंजाबमधील काही ठिकाणी केले जाऊ शकते, अशी प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. तसेच हा चित्रपट याच वर्षी ख्रिसमसला रिलीज केला जाऊ शकतो.

विजय गुप्ता निर्मित Suicide or Murder : एक स्टार खो गया’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

प्रोडक्शन हाऊसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सचिन तिवारी सुशांतच्या भूमिकेत दिसून येत आहे. या पोस्टरवर सचिनला इन्ट्रोड्यूस करताना त्याचा उल्लेख आऊटसायडर (Outsider) असा केला आहे.

कारण सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ माजली असून बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तसेच अनेकजण सुशांत इडस्ट्रीमध्ये आऊटसायडर होता. त्यामुळेच त्याला सतत सगळ्यांच्या टिकेचा सामना करावा लागत होता असा आरोप करत आहेत.

हे ही वाचा
ख्रिस्तोफर नोलनचा सर्वात मोठा चित्रपट तिसऱ्यांदा लांबणीवर
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
जाहिरात उत्पादनाचा खर्च ३० टक्क्यांनी वाढला
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सुशांतच्या चाहत्यांची दिल बेचारा ला अनोखी श्रद्धांजली

Team webnewswala

SADAK 2 ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स

Team webnewswala

परिणीती च्या ‘सायना’ चं पहिलं पोस्टर रिलीज

Team webnewswala

8 comments

Leave a Reply