Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय मनोरंजन

लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाईन

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाचा ‘लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (लिफी) ऑनलाईन आयोजित केला जाणार आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदाचा ‘लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (लिफी) ऑनलाईन आयोजित केला जाणार आहे. परिणामी मोहोत्सवात प्रदर्शित केले जाणारे सर्व चित्रपट आता प्रेक्षकांना मोफत ऑनलाईन पाहाता येणार आहेत. चाहत्यांना ‘प्लेक्सिगो’ या अ‍ॅपवरुन हे सर्व चित्रपट घरबसल्या पाहाता येतील. इच्छूकांना www.onelink.to/Plexigo या लिंकवर जाऊन प्लेक्सिगो अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.

महाराष्ट्रातील नामांकित फिल्म फेस्टिव्हल

लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्रातील एक नामांकित फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. यंदाचे त्यांचे हे पाचवे वर्ष आहे. या महोत्सवात नव्या कलाकारांना प्रोत्साहन दिलं जातं. शिवाय जगभरात गाजलेल्या भारतीय आणि विदेशी चित्रपटांचं प्रदर्शन केलं जातं.

यंदाच्या महोत्सवाची सुरुवात चित्रपट निर्माते श्री एन. एन. सिप्पी यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली जाणार आहे. शिवाय त्यांचे ‘वो कौन थी’, ‘गुमनाम, देवता’, ‘सरगम’, ‘फकिरा’, ‘चोर मचाए शोर’ असे काही गाजलेले चित्रपट देखील दाखवले जाणार आहेत.

या चित्रपट महोत्सवासंबंधीत अधिक माहितीसाठी www.liffi.in या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच विवेक के : ९८२०३१०४८७, 

इन्स्टाग्राम आणि www.facebook.com/LIFFIIndia फेसबुक लिंकवरुन इच्छूकांना आयोजकांशी थेट संपर्क साधता येईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मॉरिशस तेल गळती जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

Team webnewswala

विराट तमन्नाला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका

Team webnewswala

गणेशोत्सवानिमित्त ११ भागांची मालिका देवा श्री गणेशा

Team webnewswala

Leave a Reply