Team WebNewsWala
Other राष्ट्रीय व्यापार

लॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक

Lockdown effect: 82 lakh customers lost in April

देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. या कालावधीत दूरसंचार कंपन्यांनाही मोठा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यात देशात संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं.

याचाच मोठा फटका या कंपन्यांनाही बसला आहे. एप्रिल महिन्यात दूरसंचार कंपन्यांनी तब्बल ८२ लाख ग्राहक गमावल्याची माहिती समोर आली आहे.

एप्रिलमध्ये गमावले ८२ लाख ग्राहक

इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात दूरसंचार कंपन्यांनी २८ लाख ग्राहक गमावले होते.

अहवालानुसार या कालावधीत सर्वाधिक फटका हा एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांना बसला.

Lockdown effect: 82 lakh customers lost in April

या कालावधीत जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ‘संपूर्ण उद्योगविश्वाच्या दृष्टीनं मार्च आणि एप्रिल महिन्यात अनुक्रमे २८ लाख आणि ८२ लाख ग्राहकांची मासिक घट पाहायला मिळाली.

Lockdown effect: 82 lakh customers lost in April

रिलायन्स जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र मोठी वाढ

एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये मोठी घट होणं हे या मोठ्या आकड्यांमागील कारण आहे. तर या कालावधीत रिलायन्स जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं,’ असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Lockdown effect: 82 lakh customers lost in April

“मार्च अखेरिसपर्यंत लागू करण्यात आलेला लॉकडाउन एप्रिलच्या संपूर्ण महिन्यातही लागू होता. यामुळेच ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यापुढील कालावधीतही दूरसंचार कंपन्यांवर प्रभाव दिसून येईल,” असं संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

BARC कडून पुढील 12 आठवडे TRP वर बंदी

Team webnewswala

करोना काळात तंत्रज्ञानाची मोठी मदत, 5G वर लक्ष देण्याची गरज

Team webnewswala

आसनगावात ऊर्जा प्रकल्पातील राखेच्या वाहतुकीवरून रण

Team webnewswala

2 comments

नोकरीची सुवर्णसंधी SBI मध्ये 4 हजार पदांसाठी भरती - Web News Wala July 31, 2020 at 6:01 pm

[…] लॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी ए…  […]

Reply
५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5 - Team WebNewsWala September 18, 2020 at 11:21 pm

[…] लॉकडाउन इफेक्ट दूरसंचार कंपन्यांनी ए… July 30, 2020July 30, 202092 […]

Reply

Leave a Reply