Team WebNewsWala
राष्ट्रीय

Lockdown अटी होणार शिथिल; मॉल, सिनेमागृह होणार सुरू

नवा नियमावलीमध्ये काही अटी शिथिल करण्यात आल्या आहे. पण, आता लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मॉल, सिनेमागृह होणार सुरू.

Lockdown अटी होणार शिथिल; मॉल, सिनेमागृह होणार सुरू

Webnewswala Online Team – कोरोनाची (Maharashtra corona cases) साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवा नियमावलीमध्ये काही अटी शिथिल करण्यात आल्या आहे. पण, आता लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मॉल, सिनेमागृह होणार सुरू.

राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने नियम आणखी शिथिल करावी, अशी मागणी होत आहे. लॉकडाऊन शिथिलतेबाबत आज महत्वाचे निर्णय घोषणा करण्याची राज्य शासनाची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या कमी आहे तिथं जिल्हाबंदी शिथील होण्याची शक्यता आहे. रुग्ण संख्या कमी तिथे मॉल्स, सिनेमागृह, क्रीडांगण यांना ही परवानगी देण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन बेड आणि रूग्ण संख्या आलेख बघून जिल्ह्यात निर्बंध ठेवायचे की नाही, याबाबत शिथिलता नियमावली करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशी आहे सध्याची नियमावली ?

दरम्यान, राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पण, काही निर्बंध हे शिथिल करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी आहे, अशा जिल्ह्यातही निर्बंध हटवले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानं आता सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहणार आहेत.

ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत कोरोना पॉझिटीव्हीटी (Corona positivity rate) दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे 12 मे 2021 ब्रेक द चेन आदेशातील निर्बंधांप्रमाणे कडक निर्बंध लागू असणार आहेत.

29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल. 2011 च्या जणगणनेनुसार, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहणार आहे.

तसंच, पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक द चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.

Web Title – Lockdown अटी होणार शिथिल; मॉल, सिनेमागृह होणार सुरू ( Lockdown conditions will be relaxed; Mall, cinema going on )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

अखेर ‘राफेल’ चे भारतात ‘हॅप्पी लँडिंग’

Team webnewswala

वैष्णोदेवी यात्रेला सुरूवात २ हजार भाविकांनाच दर्शन

Team webnewswala

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं लिहिलं रक्तानं पत्र

Team webnewswala

Leave a Reply