Team WebNewsWala
Other इतर राष्ट्रीय व्यापार

लाॅकडाउनने बदलला घर विक्रीचा ट्रेंड डिजिटल विक्रीला चालना

आता लाॅकडाउनने बदलला घर विक्रीचा ट्रेंड घरबांधणी व्यवसायात मूळ अन्य व्यवसाय असलेल्या व त्या व्यवसायात लोकांचा विश्वास जिंकलेल्या कंपन्या उतरल्यामुळे ऑनलाइन घरविक्रीमध्येही विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाचा शिरकाव या निमित्ताने घरविक्रीच्या क्षेत्रात झाला आहे. घरखरेदी ही प्रत्यक्ष पाहून केली जात असल्यामुळे या क्षेत्रात इतकी वर्षे ई-कॉमर्सला फारसा वाव नव्हता. त्याचप्रमाणे ग्राहकाकडूनही ऑनलाइन घरखरेदीचा स्वीकार होत नव्हता. परंतु आता लाॅकडाउनने बदलला घर विक्रीचा ट्रेंड घरबांधणी व्यवसायात मूळ अन्य व्यवसाय असलेल्या व त्या व्यवसायात लोकांचा विश्वास जिंकलेल्या कंपन्या उतरल्यामुळे ऑनलाइन घरविक्रीमध्येही विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.

लाॅकडाउनने बदलला घर विक्रीचा ट्रेंड

मुंबईसारख्या महानगरांप्रमाणे पालघरसारख्या शहरांतही आता ऑनलाइन घरविक्रीला लोक प्राधान्य देऊ लागले आहेत. महिंद्र लाइफस्पेसेसचा पालघरचा गृहप्रकल्प १०० टक्के ऑनलाइन विक्री करतो आहे.

घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच स्टॅम्प ड्युटी कमी केली. याचे स्वागत करून सुब्रमणियम म्हणाले, ग्राहकांसाठी ही अत्यंत चांगली गोष्ट झाली आहे. रेडी रेकनरचे दरही सरकारने सुधारले आहेत. विकासकांसाठी सरकारने रेरा डेडलाइन सहा महिन्यांनी वाढवली आहे.

ग्राहकांचे तीन ट्रेंड
सध्या ग्राहकांचे तीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्यापैकी भीतीने ग्रासलेला ग्राहक घरखरेदीचे बेत लांबणीवर टाकतो आहे, याकडे अरविंद सुब्रमणियम यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले,
  • रोजगाराबाबत सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे घराचे हप्ते कसले भरायचे हा प्रश्न निर्माण रोजगार गमावलेल्यांसमोर आहे.
  • त्याचवेळी घरून काम सुरू झाल्यामुळे छोट्या जागेत सर्वांनी काम, शाळा करणे अडचणीचे होत आहे. म्हणून केवळ मोठ्या घराचा विचार करत नव्या घरखरेदीसाठी उत्सुक असणारेही ग्राहक दिसत आहेत.
  • त्याचप्रमाणे तिसऱ्या प्रकारच्या ग्राहकांमध्ये करोना संकटापूर्वी १ बीएचके घर बुक केले असेल तर आता घरून काम पद्धतीमुळे त्याऐवजी त्याच गृहप्रकल्पात १ बीएचके घर रद्द करून त्या पैशांनी २ बीएचके घर बुक करता येईल का किंवा २ बीएचके घरामध्ये आदीचे घर अपग्रेड करता येईल का, अशी विचारणा करणाराही ग्राहक दिसतो आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

वडिलांची वर्षभराची कमाई फक्त अमेरिका प्रवासावर खर्च सुंदर पिचाई

Team webnewswala

ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार

Team webnewswala

फेसबुक बंद करणार आपले हे लोकप्रिय अ‍ॅप

Team webnewswala

Leave a Reply