Team WebNewsWala
क्राईम शहर

चौथ्यांदा दंड झाल्यास लायसन्स रद्द

वाहतूक नियमभंग केल्याबद्दल चौथ्यांदा दंड झाल्यास लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन हजार चालकांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित

मुंबई : वाहतूक नियमभंग केल्याबद्दल चौथ्यांदा दंड झाल्यास लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वाहतूक पोलिसांनी चौथ्यांदा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे दोन हजार चालकांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. लायसन्स रद्द का केले जाऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही वाहतूक पोलीस संबंधित चालकांना बजावणार आहेत.

वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलीस आक्रमक

वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांनी या माहितीस दुजोरा दिला. चौथ्यांदा दंड झाल्यास लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू राहील. पहिल्या टप्प्यात दोन हजार अनुज्ञप्ती निलंबित करण्याबाबत आरटीओकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे, रस्त्यावर पोलीस नाहीत हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये, हा या कारवाईमागील उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तीनपेक्षा जास्त वेळेस नियम मोडलेल्या चालक शोधून त्यांचेही परवाने निलंबित करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल.

ई चलन प्रणाली सुरू झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी प्राधान्याने वाहतूक नियमनाकडे लक्ष केंद्रित केले. तर नियम मोडणाऱ्या चालकांवरील कारवाई किंवा दंड आकारणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांआधारे केली जाऊ लागली. नियमभंग करणारे वाहन आढळल्यास नोंदणी क्रमांकाचे छायाचित्र काढून त्याआधारे वाहन मालकाचे तपशील शोधून त्याला ईमेल किंवा लघुसंदेशाद्वारे ई चलन पाठवले जाते.

दोन हजार चालकांवर कारवाई

पूर्वी वाहतूक पोलीस वाहन अडवून जागच्या जागी दंड वसूल करत. पैसे नसल्यास चालकाची अनुज्ञप्ती किंवा अन्य कागदपत्रे जप्त करत. ती सोडवून घेण्यासाठी चालकाला चौकी किंवा मुख्यालयात यावे लागे. चालक चौकीत न आल्यास हे प्रकरण न्यायालयात दाखल केले जाई. ई चलन प्रणालीमुळे दंड भरण्याची सक्ती, वाहन किंवा अनुज्ञप्ती जप्ती होत नसल्याने वाहनचालक बेशिस्त झाले. असे लक्षात आल्याने चालकांना वाहतूक नियम मोडल्यास काय होऊ शकते याची जाणीव करून देण्यासाठी ही कारवाई हाती घेतल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वाधिक दंड दुचाकीस्वारांना

वाहतूक पोलिसांच्या निरीक्षणानुसार सर्वाधिक दंड दुचाकीस्वारांवर आकारण्यात येतो. तिघांचा प्रवास, विनाहेल्मेट, सिग्नल मोडणे, वेग मर्यादा आदी नियमभंगांत दुचाकीस्वार सर्वात पुढे आहेत. तर पार्किंगचा नियम मोडल्याबद्दल सर्वाधिक कारवाई कारचालकांवर होते.

३१८ कोटींची वसुली बाकी

आजघडीला मुंबई पोलिसांनी आकारलेल्या दंडापैकी ३१८ कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत. साधारणपणे १८ टक्के चालक नियमितपणे दंडाची रक्कम भरतात.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबईत ट्रेन बंद असल्याने वसईची फुलशेती संकटात

Team webnewswala

खासदार रविकिशन यांना आता Y + Security

Team webnewswala

Big Boss 14 सुखविंदर कौरची कशी झाली राधे मां

Team webnewswala

Leave a Reply