Team WebNewsWala
मनोरंजन शहर

पुन:प्रदर्शित मराठी चित्रपट प्रेक्षकांची पाठ

दूरचित्रवाणीवर तसेच चित्रपटगृहात पाहिलेले मराठी चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहण्यास प्रेक्षकांना स्वारस्य नसल्याने मराठी चित्रपटांना नगण्य प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : दूरचित्रवाणीवर तसेच चित्रपटगृहात पाहिलेले मराठी चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहण्यास प्रेक्षकांना स्वारस्य नसल्याने ‘फत्तेशिकस्त’, ‘हिरकणी’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘चोरीचा मामला’, ‘नटसम्राट’, या मराठी चित्रपटांना नगण्य प्रतिसाद मिळत आहे. या पाश्र्वभूमीवर चित्रपटगृह मालक आणि वितरक बिग बजेट चित्रपटांच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसले आहे.

राज्य शासनाच्या परवानगीनंतर करोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करत राज्यातील काही चित्रपटगृहे सुरू झाली. सध्या कोणताही ‘बिग बजेट’ हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर नसल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यासाठी लोकप्रिय चित्रपट पुनप्रदर्शित केले जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये ‘फत्तेशिकस्त’, ‘हिरकणी’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘चोरीचा मामला’, ‘नटसम्राट’ हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. मुंबई, ठाणे, अकलूज, कोल्हापूर, नाशिक, नवी मुंबई येथील चित्रपटगृहात त्यांचे खेळ होत आहेत. मात्र प्रेक्षकांनी त्यांच्याकडे पाठच फिरवल्याचे दिसून येते. रोज एकच शो असलेल्या या चित्रपटगृहात नऊ ते दहा प्रेक्षकच हजेरी लावत आहेत.

सिनेमगृहांचे लक्ष ८3 आणि सूर्यवंशी वर

देशातील बहुतांश चित्रपटगृहे अजूनही बंदच आहेत. जानेवारीशिवाय मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने अजूनही एकपडदा चित्रपटगृहांचे मालक चित्रपटगृह सुरू करण्यास कचरत आहेत. याचा फटका मराठी चित्रपटांना बसत असल्याचे सिने वितरक असलेल्या अंकित चंदीरामानी यांनी सांगितले. मुंबईप्रमाणे पुण्यातही मराठी चित्रपटांना यथातथाच प्रतिसाद मिळत आहे.

हे लोकप्रिय चित्रपट प्रेक्षकांनी टीव्हीवर अथवा चित्रपटगृहात पाहिल्याने पुन्हा पाहण्यात स्वारस्य नाही. त्यामुळेही प्रेक्षकांचा नगण्य प्रतिसाद असल्याची प्रतिक्रिया ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे सेक्रेटरी प्रकाश चाफळकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

‘८३’ आणि ‘सूर्यवंशी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक चित्रपटगृहाकडे येतील, अशी आशा निर्माते तसेच सिने वितरकांकडून व्यक्त केली जात आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

NetFlix मुंबईत उभारणार जगातील पहिला स्टुडीओ

Web News Wala

मुंबईत वर्षांला ३२ हजार श्वानांचे निर्बीजीकरण

Team webnewswala

अनिल कपुर चा मराठी बाणा, गुजराथी प्रश्नाला मराठीत उत्तर

Web News Wala

Leave a Reply