Team WebNewsWala
Other पर्यावरण शहर

घोडबंदर मार्गावरील वसाहतीत बिबटय़ा आढळून आल्याची चर्चा

परिसरात बिबटय़ाची विष्ठा आढळून आली आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील वसाहतीत बिबटय़ाचा वावर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ठाणे : घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पातलीपाडा उड्डाणपुलाशेजारीच असलेल्या विद्युत केंद्राजवळ सोमवारी रात्री बिबटय़ाने एका श्वानाची शिकार केल्याचा दावा सुरक्षा रक्षकाने केला होता. या दाव्यानंतर वन विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी केलेल्या पाहणीमध्ये परिसरात बिबटय़ाची विष्ठा आढळून आली आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील वसाहतीत बिबटय़ा चा वावर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

घोडबंदर मार्गावरील वसाहतीत बिबटय़ा आढळून आल्याची अनेकदा  र्चा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर तसेच घोडबंदर परिसरात मोठे जंगल आहे. त्यालगतच गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे जंगलातील बिबटे या गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारापर्यंत येत असल्याची बाब यापूर्वी अनेकदा समोर आली आहे. असे असतानाच सतत वाहनांची वर्दळ सुरू असलेल्या घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा उड्डाणपुलाशेजारीच असलेल्या विद्युत केंद्राजवळ सोमवारी रात्री एक बिबटय़ा आढळून आल्याची चर्चा रंगली होती.

विद्युत केंद्रामधील सुरक्षा रक्षकाने केला दावा 

विद्युत केंद्रामधील एका सुरक्षा रक्षकाने हा दावा केला होता. त्याने बिबटय़ाला प्रत्यक्ष पाहिले नव्हते. मात्र परिसरातून बेपत्ता असलेल्या श्वानाची बिबटय़ाने शिकार केल्याचा दावा त्याने केला होता. याबाबत माहिती मिळताच ठाणे वन परिक्षेत्राचे अधिकारी नरेंद्र मुठे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी सुरू केली होती. त्यामध्ये परिसरात बिबटय़ाची विष्ठा आढळून आली आहे. या संदर्भात ठाणे परिमंडळाचे वनपाल संजय पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यांस दुजोरा दिला आहे. त्यामुळे विद्युत केंद्रामधील वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बिबटय़ापासून बचाव कसा करावा, याबाबत जनजागृती केली आहे. तसेच परिसरात जास्त प्रकाशाचे दिवे लावण्याच्या सूचना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

वैष्णोदेवी यात्रेला सुरूवात २ हजार भाविकांनाच दर्शन

Team webnewswala

चीनला दणका, गुगलने हटवले 2500 युट्यूब चॅनेल्स

Team webnewswala

अमिताभ बच्चन सनी लिओनी बनले सख्खे शेजारी

Web News Wala

Leave a Reply