Other समाजकारण

MumUni School Of Thoughts तर्फे प्रा. संजीव चांदोरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

MumUni School Of Thoughts
MumUni School Of Thoughts अकादमीच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत शनिवार, दि. 3 ऑक्टोबर 2020 रोजी  ‘जगाची निर्जागतिकरणाकडे वाटचाल ?’ ह्या विषयावर टाटा सामजिक विज्ञान संस्था, मुंबई चे प्रा.संजीव चांदोरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. MumUni School Of Thoughts तर्फे आयोजित केलेले हे सतरावे व्याख्यान होते.

निर्जागतिकीकरणबद्दल प्रसिद्ध लेखक आणि अभ्यासक प्राध्यापक संजीव चांदोरकर यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या

प्रा. संजीव चांदोरकर यांनी प्रस्तुत विषयाची मांडणी जागतिकीकरण, गेल्या चाळीस वर्षांतील जागतिकीकरणाचे स्वरुप, कोरोना काळ व निर्जागतिकीकरण (De-Globalization) या मुद्द्यांच्या आधारे केली.
पहिला मुद्दा स्पष्ट करताना प्रा.चांदोरकर यांनी जागतिकीकरणामधील राष्ट्राचे स्थान, जागतिकीकरणाचे प्रारुप व त्याला गतिमान करणारे घटक ह्यांचे विश्लेषण केले. जागतिकीकरणामुळे राष्ट्र ह्या एककाचे एकजीनसी होण्याची प्रक्रिया थांबली व मानवनिर्मित उत्पादनांना जागतिक ओळख मिळाली. जागतिकीकरणाच्या एककल्ली प्रारुपामुळे त्यावर टीका होते.

जागतिकीकरणाने खासगीकरण व उदारीकरण यांना देशांतर्गत व देशाबाहेर अधिक गतिमान केले.

गेल्या चाळीस वर्षांतील जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये परकीय गुंतवणूक (F.D.I ), वस्तूंच्या किमती व व्यापार, स्थलांतर ह्या मध्ये वाढ झाली आहे. जगातील एकूण वित्त भांडवल व कर्ज ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या किंमती ठरवण्याचे प्रारुप बदलणे व वस्तूंच्या किंमती अस्थिर होण्यात झाला. बहुराष्ट्रीय कंपन्यांची बाजारपेठेवरील मक्तेदारी वाढली, ब्रेक्झीट घडले व W.T.O. व G.W.T.O.हतबल झाले.

कोरोनाच्या काळात निर्जागतिकीकरण गतिमान झाले असले तरी ते पूर्ण स्वरूपात अस्तित्त्वात आलेले नाही. असे निरीक्षण नोंदवताना प्रा.चांदोरकरांनी त्याची कारणे स्पष्ट केली. ती म्हणजे जागतिकीकरणाच्या आर्थिक तत्त्वज्ञानालाअजून तरी आव्हान मिळालेले नाही. तसेच जागतिकीकरणात उदयास आलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सरकारे बदलण्या इतक्या तगड्या आहेत. याच काळात जगामध्ये वाढलेला वंशवाद, धर्मवाद यामधून निर्माण झालेल्या असंतोषाचे रुपांतर कसे असेल ह्यावरून एक नवे रुप निर्माण होईल. मात्र निर्जागतिकीकरण होणार नाही असे मत प्रा.चांदोरकर यांनी व्यक्त केले.

जागतिकीकरण व निर्जागतिकीकरण यांच्या स्वरुपापेक्षा त्यांचा भयावह परिणाम समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची आवश्यकता

संपूर्ण व्याख्यान पाहण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा – https://www.youtube.com/watch?v=7kuhWwi82fg

संपर्क –
mumunischoolofferencests@gmail.com
आमच्याशी Facebook वर कनेक्ट होण्यासाठी: – https://www.facebook.com/groups/mumunischoolofthoughts/

Subscribe our YouTube Channel – https://www.youtube.com/channel/UCgaosgZhoL8BglS5KJ6S0YQ

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

लवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा – BCCI

Team webnewswala

अयोध्येनंतर पेटणार मथुरेचा श्रीकृष्ण जन्मभूमी वाद

Team webnewswala

‘सही रे सही’ नाटकाला १५ ऑगस्टला १८ वर्षे पूर्ण

Team webnewswala

Leave a Reply