Team WebNewsWala
अर्थकारण नोकरी

UAN शिवाय जाणून घ्या PF Balance

आपण आपल्या PF Balance UAN नंबरशिवाय तपासू शकता. तसंच यूएएन नंबर शिवाय आपल्या पीएफ खात्यातून पैसेही काढू शकता.

UAN शिवाय जाणून घ्या PF Balance

आपण ईपीएफओ सदस्य आहात आणि तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासायची आहे. मात्र, आपण आपला UAN नंबर विसरला आहात. अशावेळी काय करायचं म्हणून हैरान होऊ नका. आपण आपल्या PF Balance UAN नंबरशिवाय तपासू शकता. तसंच यूएएन नंबरशिवाय आपल्या पीएफ खात्यातून पैसेही काढू शकता.

UAN पूर्ण जीवनभर वैध 

युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN हा १२ अंकी नंबर आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) प्रत्येक सदस्याला UAN क्रमांक प्रदान केला जातो. हा एक कायमस्वरूपी नंबर असतो आणि एका सदस्यासाठी तो पूर्ण जीवनभर वैध राहातो.

UAN शिवाय PF Balance काढण्याची प्रक्रिया

सर्व प्रथम ईपीएफओ वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करा.

यानंतर “Click Here to Know your EPF Balance वर क्लिक करा.

आता आपण epfoservices.in/epfo/ या लिंकवर जाल. येथे आपल्याला Member Balance Information वर क्लिक करावे लागेल.

येथे आपल्याला आपले राज्य निवडावे लागेल आणि आपल्या ईपीएफओ कार्यालय लिंकवर क्लिक करावे लागेल.

आता आपल्याला आपला पीएफ खाते क्रमांक, नाव आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर भरावा लागेल.

त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला स्क्रीनवर आपली पीएफ शिल्लक दिसेल.

UAN शिवाय पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया

अनेकदा UAN नंबर जनरेट न झाल्याने किंवा नंबर विसरल्याने पीएफ अकाऊंटमधून पैसे काढताना मोठया अडचणींचा सामाना करावा लागतो. मात्र, यूएएन नंबरशिवाय सुद्धा कर्मचारी पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकतात.

पीएफ अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी एक पीएफ विड्रॉल फॉर्म भरावा लागेल आणि तो स्थानिक पीएफ ऑफिसमध्ये जाऊन जमा करावा लागेल. ईपीएफ सदस्याला यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून आधार-बेस्ड नवीन समग्र क्लेम फॉर्म किंवा नॉन-आधार समग्र क्लेम फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. आता तुम्ही हा फॉर्म भरून पीएफ अकाऊंटमधून आंशिक किंवा पूर्ण रक्कम काढू शकता.

पीएफ अकाऊंटमधून आंशिक किंवा पूर्ण रक्कम काढू शकता

पीएफ अकाऊंटमधून पूर्ण रक्कम कर्मचारी त्या स्थितीत काढून शकतो, जेव्हा त्याची रिटायर्डमेंट झाली असेल किंवा कर्मचारी दोन महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल. जर ईपीएफ सदस्य महिनाभर बेरोजगार राहिला तर तो पेन्शन फंडामधून त्याच्या एकूण पीएफ रकमेपैकी ७५ टक्के रक्कम काढू शकतो.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

SBI करतेय लिलाव; खरेदी करा घर, दुकान आणि प्लॉट

Team webnewswala

Swiggy कर्मचाऱ्यांना आता आठवड्यात 4 दिवस काम

Web News Wala

मालवण स्कुबा डायविंग परवानगी प्रक्रियेत MTDC ला विरोध

Team webnewswala

Leave a Reply