Team WebNewsWala
Other धर्म पर्यावरण

गणेशोत्सवातील महत्वाची गोष्ट माटी बद्दल घ्या जाणुन

माटी हे कोकणच्या समृद्ध नैसर्गिक, सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटी बांधतात. यामध्ये वनस्पतींची फळे, पाने, फुले बांधली जातात.
माटी बांधल्यात काय रे ?

माटी हे कोकणच्या समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटी बांधण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची फळे, पाने, फुले बांधली जातात. हे बांधण्यासाठी लाकडाची माटी वापरली जाते. जी साधारण आयताकृती असते आणि त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या असतात.
कोकण हे विविध वनस्पतींनी नटलेले आहे. आणि त्यात श्रावण-भाद्रपद महिन्यात येणार्‍या बहाराने ते अजून नटून जाते. माटी बांधण्याचा धार्मिक उद्देश म्हणजे, ही पृथ्वी म्हणजे साक्षात श्री देवी पार्वतीचे रुप आहे आणि ती गणेशाच्या आगमनासाठी विविध वनस्पतींच्या रुपांनी नटली आहे. त्यामुळे याच काळात बहरणाऱ्या वनस्पतींचा वापर माटीमध्ये केला जातो.

माटीमधील सर्वात आवश्यक गोष्टी म्हणजे आंब्याचे टाळ, किवनीचे दोर, उतरलेला नारळ, शिप्टा आणि तवसा.

आंब्याचे टाळे :- आंबा Mangifera indica (Anacardiaceae) माटीमधील सर्वात महत्वाचे झाड म्हणजे आंबा. कोकणात बऱ्याच पवित्र कार्यात आंब्याचे टाळे म्हणजे फांद्यांची डहाळे वापरले जातात. हे टाळे फक्त आंबोलीचेच (रायवळ आंबा) असले पाहिजेत. गारपाच्या (कलमी) आंब्याच्या टाळ्यांचा वापर होत नाही.

1) आंब्याचे टाळे :- आंबा

Mangifera indica (Anacardiaceae)
माटीमधील सर्वात महत्वाचे झाड म्हणजे आंबा. कोकणात बऱ्याच पवित्र कार्यात आंब्याचे टाळे म्हणजे फांद्यांची डहाळे वापरले जातात. हे टाळे फक्त आंबोलीचेच (रायवळ आंबा) असले पाहिजेत. गारपाच्या (कलमी) आंब्याच्या टाळ्यांचा वापर होत नाही.

केवणीचे दोर (किवनीचे दोर) :- केवण / मुरडशेंग Helicteris isora (Malvaceae) आंब्याचे टाळे किंवा इतर गोष्टी माटीला बांधण्यासाठी केवणीच्या झाडाच्या सालीचे दोर वापरतात. ही साल खुप मजबूत असते त्यामुळे तीचा वापर केला जातो. केवण हे एक झुडूप आहे. त्याला लाल फुले व पिळदार शेंगा येतात. केवणीच्या शेंगांना मुरडशेंग म्हटले जाते. मुरडशेंग ही लहान मुलांच्या औषधी सानशी तील एक आहे.

2) केवणीचे दोर (किवनीचे दोर) :- केवण / मुरडशेंग

Helicteris isora (Malvaceae)
आंब्याचे टाळे किंवा इतर गोष्टी माटीला बांधण्यासाठी केवणीच्या झाडाच्या सालीचे दोर वापरतात. ही साल खुप मजबूत असते त्यामुळे तीचा वापर केला जातो. केवण हे एक झुडूप आहे. त्याला लाल फुले व पिळदार शेंगा येतात. केवणीच्या शेंगांना मुरडशेंग म्हटले जाते. मुरडशेंग ही लहान मुलांच्या औषधी सानशी तील एक आहे.

उतरलेला नारळ :- नारळ / माड Cocos nucifera (Arecaceae) माटीमधील महत्वाचे फळ म्हणजे नारळ. खास माटीसाठी झाडावरून न पाडता तर उतरलेला नारळ वापरला जातो.

3) उतरलेला नारळ :- नारळ / माड

Cocos nucifera (Arecaceae)
माटीमधील महत्वाचे फळ म्हणजे नारळ. खास माटीसाठी झाडावरून न पाडता तर उतरलेला नारळ वापरला जातो.

शिप्टा (कातरो) :- सुपारी / फोफळ Areca catechu (Arecaceae) शिप्टा म्हणजे सुपारीच्या फळांचे घोस. यांचाही वापर माटीत प्रामुख्याने होतो.

4) शिप्टा (कातरो) :- सुपारी / फोफळ

Areca catechu (Arecaceae)
शिप्टा म्हणजे सुपारीच्या फळांचे घोस. यांचाही वापर माटीत प्रामुख्याने होतो.

तवसा (काकडी) :- काकडी Cucumis sativus (Cucurbitaceae) काकडी ही पावसाळ्यात उगवणाऱ्या भाजांपैकी एक व त्यामुळे माटीत काकडी (तवसा) चा समावेश असतो. तसेच याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार व उपलब्धतेनुसार विविध इतर फळेही माटीला बांधतात. गणेश विसर्जनावेळी नारळ व काकडी कापून प्रसाद म्हणून वाटली जाते.

5) तवसा (काकडी) :- काकडी

Cucumis sativus (Cucurbitaceae)
काकडी ही पावसाळ्यात उगवणाऱ्या भाजांपैकी एक व त्यामुळे माटीत काकडी (तवसा) चा समावेश असतो. तसेच याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार व उपलब्धतेनुसार विविध इतर फळेही माटीला बांधतात. गणेश विसर्जनावेळी नारळ व काकडी कापून प्रसाद म्हणून वाटली जाते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पर्यावरण पुरक गणेशोत्सव साठी Roatary Club Of Dombivali Midtown सज्ज

Team webnewswala

ताजमहाल क्षेत्रातील 4000 झाड कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Web News Wala

वेबन्यूजवाला आयोजित माझा बाप्पा स्पर्धा 2020

Team webnewswala