Team WebNewsWala
अर्थकारण तंत्रज्ञान

यूपीआय व्यवहारासाठी ‘UPI Help’ सुरू

डिजिटल व्यवहारासाठी भीम यूपीआय वापरणार्‍या ग्राहकांच्या पेमेंट प्लॅटफॉर्ममध्ये 'UPI Help' सुविधा जोडली गेली आहे.

यूपीआय व्यवहारासाठी ‘UPI Help’ सुरू

डिजिटल व्यवहारासाठी भीम यूपीआय वापरणार्‍या ग्राहकांच्या पेमेंट प्लॅटफॉर्ममध्ये ‘UPI Help’ सुविधा जोडली गेली आहे. याच्या मदतीने ग्राहकांना त्यांच्या पेंडिंग व्यवहाराची स्थिती जाणून घेता येईल आणि तक्रारही नोंदवता येईल.

एनपीसीआयने भीम यूपीआय वर ‘UPI Help’ सुरू केली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) म्हटले आहे की कस्टमर फ्रेंडली आणि ट्रांसपरेंट रेड्रेरसल सिस्टम तयार करण्याच्या दृष्टीने हे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुरूप आहे.

एनपीसीआयने दिलेल्या निवेदनानुसार एनपीसीआयने भीम यूपीआय वर ‘UPI Help’ सुरू केली आहे.सुरुवातीला एनपीसीआयने भीम अ‍ॅपवर हे फीचर्स भारतीय स्टेट बँक, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी सादर केले आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेत लवकरच UPI Help सुविधा मिळेल

पेटीएम पेमेंट्स बँक आणि टीजेएसबी सहकारी बँकेचे ग्राहकही लवकरच यूपीआय-हेल्पचा लाभ घेण्यास सक्षम होतील, असे एनपीसीआयने म्हटले आहे. यूपीआय वापरणार्‍या अन्य बँकांचे ग्राहकही येत्या काही महिन्यांत या सुविधेचा लाभ घेऊ शकतील, असे एनपीसीआयने म्हटले आहे.

प्रसिद्धीनुसार ग्राहक आपल्या पेंडिंग ट्रांजेक्शनची स्थिती शोधू शकतील आणि व्यवहाराशी संबंधित तक्रारींसाठी UPI Help वापरू शकतील. अ‍ॅपमध्ये मर्चेंट व्यवहारांसाठी तक्रार करण्याची सुविधा देखील असेल.

NPCI भारतातील रिटेल पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टमसाठी अम्ब्रेला आर्गनाइजेशन

एनपीसीआय ही भारतातील रिटेल पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टमसाठी अम्ब्रेला आर्गनाइजेशन आहे. एनपीसीआयच्या पेमेंट प्रॉडक्ट्स पोर्टफोलिओमध्ये रुपी कार्ड, इमीडिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय), भारत इंटरफेस फॉर मनी (बीएचआयएम), BHIM आधार, नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी फास्टॅग) आणि भारत बिल पे यांचा समावेश आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राहुल बजाज यांचा बजाज फ़ायनान्स च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Team webnewswala

Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान

Team webnewswala

WhatsApp ला पर्याय Signal App चा

Web News Wala

Leave a Reply