Team WebNewsWala
पोटोबा राष्ट्रीय समाजकारण

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची सुरुवात

वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेला चालना देण्यासाठी ग्राहक कार्य, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारे माय रेशन मोबाईल अ‍ॅप सुरू
वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची सुरुवात

नवी दिल्ली – वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेला चालना देण्यासाठी ग्राहक कार्य, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारे माय रेशन मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले. जे लोक आपले गाव सोडून इतर शहरात मजुरी, नोकरी किंवा कामासाठी राहतात, त्यांच्यासाठी हे अ‍ॅप फायदेशीर आहे. याद्वारे ते जिथे राहत आहेत, तेथे त्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे. (One Nation One Ration Card: Launch My Ration Mobile App; Grain Now Available In Any Corner Of The Country)

माझे रेशन हे अ‍ॅप शुक्रवारी लाँच

हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव म्हणाले की, वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची सुरुवात केवळ 4 राज्यांमधून ऑगस्ट 2019 मध्ये झाली होती. अगदी अल्प कालावधीत याची अंमलबजावणी देशातील 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालीय, तर उर्वरित दिल्ली आणि आसाम, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील अन्य तीन राज्यांमध्येही अंमलबजावणी पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे.

दरमहा 1.5 कोटी लोक या योजनेत सामील होतायत

या योजनेंतर्गत सुमारे 69 कोटी एनएफएसए (National Food Security Act) लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे, जे एकूण एनएफएसए लोकसंख्येच्या सुमारे 86 टक्के आहेत. देशात दरमहा सरासरी 1.5 ते 1.6 कोटी लोक या योजनेशी जोडले जात आहेत. पांडे म्हणाले की, या योजनेंतर्गत कोरोना साथीच्यादरम्यान कोविड -19 चा विशेषत: प्रवासी कामगारांना फायदा झाला आणि त्यांना अनुदानावर धान्य मिळाले. टाळेबंदीच्या वेळी जिथे लाभार्थी होते, तेथे या सुविधेचा लाभ घेऊन त्यांना धान्य मिळू शकले.

वन नेशन वन रेशन कार्ड जनजागृतीसाठी 2400 स्थानकांवर घोषणा

लाभार्थ्यांना या योजनेची जाणीव व्हावी, यासाठी देशभरातील 2400 हून अधिक रेल्वे स्थानकांवर हिंदी आणि स्थानिक भाषांमध्ये घोषणा दिल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशासह रेडिओ जाहिरात देशातील 167 एफएम रेडिओ आणि 91 सामुदायिक रेडिओ स्टेशनमधून केली जात आहे. राज्य परिवहन बसेसवर जाहिरात बॅनर लावण्यात आली आहेत. बॅनर आणि पोस्टर्सच्या माध्यमातूनही लोकांना जागरूक केले जात आहे. त्याचबरोबर ट्विटर, यू ट्यूबसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील वापरण्यात येत आहेत.

लाभार्थी कोणत्याही भागातून रेशन मिळवू शकतात

या योजनेंतर्गत अन्न आणि पुरवठा विभाग राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत रेशनकार्ड पोर्टेबिलिटीसाठी देशव्यापी मोहीम राबवित आहे. या व्यवस्थेमुळे सर्व एनएफएसए लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थ्यांना सुविधा उपलब्ध आहे. याअंतर्गत लाभार्थ्यास संपूर्ण रेशन किंवा त्यातील काही भाग देशातील कोणत्याही स्वस्त दर दुकानातून घेण्याचा अधिकार आहे.

आधारद्वारे लाभार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात

बायोमेट्रिक किंवा आधारद्वारे लाभार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात आणि रेशन घेऊ शकतात. या प्रणालीच्या मदतीने अशा प्रकारच्या प्रवासी कामगारांच्या कुटुंबीयांना त्याच रेशनकार्डमधून दुसर्‍या ठिकाणी परत आल्यास उर्वरित रेशन मिळण्याची सोयदेखील आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

‘HotShots’ वेबसिरीज ॲपवर बंदी

Team webnewswala

कोरोनामुळे गुलाबाचे गांडुळ खत बनविण्याची परिस्थिती

Team webnewswala

पुण्याची ‘सीरम’ आता बनवणार स्फुटनिक V लस

Web News Wala

Leave a Reply