Team WebNewsWala
नोकरी राष्ट्रीय

Labour codes मोदी सरकार करणार नवे कामगार कायदे लागू

येत्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार चार कामगार कायदे (Labour codes) लागू करण्याची शक्यता. सरकार या कामगार कायद्यांवर अखेरचा हात फिरवत असून ते लागू करण्याची तयारी

Labour codes मोदी सरकार करणार नवे कामगार कायदे लागू

Webnewswala Online Team – येत्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार चार कामगार कायदे (labor codes) लागू करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार या कामगार कायद्यांवर अखेरचा हात फिरवत असून ते लागू करण्याची तयारी सुरु झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हाती येणारा पगार (Take home salary) कमी होणार आहे, तर पीएफ वाढणार (PF increased) आहे. कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांच्या पीएफ फंडमध्ये जादा पैसे टाकावे लागणार आहेत.

नव्या नियमांमुळे बेसिक सॅलरी, भत्ते आणि पीएफचे गणित बदलणार

या चार कायद्यांमध्ये वेतन, मजुरी नियम, औद्योगिक संबंधांवर नियम, कामावेळची सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती (OSH) नियम तसेच सामाजिक आणि व्यावसायिक सुरक्षा नियमांचा समावेश आहे. कामगार मंत्रालयाने हे कायदे एप्रिल 2021 पासून लागू करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ते टाळण्यात आले होते. यामुळे कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या स्ट्रक्चरचे पुनर्रचना करण्यास पुरेसा वेळ मिळाला.

मंत्रालयाने या चारही कायद्यांना अंतिम रुप दिले होते. मात्र, ते अंमलात आणण्यात आले नाहीत. कारण अनेक राज्ये हे कायदे लागू करण्याच्या मनस्थितीत नव्हती. भारतीय संविधानानुसार कामगारांशी संबंधित कायदे हे केंद्राने राज्यांना आणि राज्यांनी केंद्राला कळविल्याशिवाय किंवा संमती घेतल्याशिवाय लागू करता येत नाहीत. राज्यांची संमती घेतल्यावर हे कायदे लागू होऊ शकतात. पीटीआयला सूत्रांनी या नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीची माहिती दिली आहे. पुढील दोन महिन्यांत हे कायदे लागू होतील.

काय आहे तरतूद… 

नवीन कायद्यांनुसार (wages code) सर्व भत्ते एकूण वेतनाच्या 50 टक्क्य़ांपेक्षा अधिक असू शकत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ही एकूण वेतनाच्या 50 टक्के होणार आहे. याचबरोबर कंपनी आणि कर्मचाऱ्याचे एकूण पीएफ कॉन्ट्रीब्युशन (PF Contribution) वाढणार आहे. सोबतच ग्रॅच्युईटीची रक्कमदेखील वाढविली जाणार आहे. याचा थेट अर्थ असा की कर्मचाऱ्याची सेव्हिंग वाढणार आहे, मात्र, इन हँड सॅलरी कमी होणार आहे.

Web Title – Labour codes मोदी सरकार करणार नवे कामगार कायदे लागू ( Labor codes Modi government will implement new labor laws )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Internet Speed चांगला येतो म्हणून छतावर बसून पीक विम्याचे अर्ज

Team webnewswala

‘ग्लोबल टीचर’ रणजितसिंह डिसले ना राज्यपाल नियुक्त आमदार करा

Team webnewswala

EMI Moratorium वर तारीख पे तारिख

Team webnewswala

Leave a Reply