मनोरंजन समाजकारण

KGF Star यश बेरोजगार मजुरांसाठी कोट्यवधीचे दान

'मिलेनियल अँग्री यंग मॅन' म्हणून ओळखला जाणारा कन्नड KGF Star यश पडद्यावर जितका दमदार आहे, ख-या आयुष्यात तितकाच जिगरबाज.

KGF Star यश बेरोजगार मजुरांसाठी कोट्यवधीचे दान

Webnewswala Online Team – ‘मिलेनियल अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखला जाणारा कन्नड KGF Star यश ( Yash ) पडद्यावर जितका दमदार आहे, ख-या आयुष्यात तितकाच जिगरबाज. सध्या चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत. यशने कामही तसेच केलेय. होय, कन्नड फिल्म इंडस्ट्रीत काम करणा-या 3 हजार कामगारांना यशने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीत रोजंदारीवर काम करणा-या 3 हजार कामगारांसाठी 1.5 कोटी दान करण्याची घोषणा नुकतीच यशने केली. त्याच्या या घोषणेनंतर प्रत्येक वर्करच्या अकाऊंटमध्ये प्रत्येकी 5 हजार रूपये ट्रान्सफर केले जाणार आहेत.

3 हजार कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रूपये

यशने इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो लिहितो, ‘कोव्हिड 19 ने संपूर्ण देशातील असंख्य लोकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. आपली कन्नड फिल्म इंडस्ट्रीही प्रभावित झालीये. या कठीण काळात मी माझ्या कमाईतून 3 हजार कामगारांच्या खात्यात या महिन्यात प्रत्येकी 5 हजार रूपये ट्रान्सफर करणार आहे. या कठीण परिस्थितीत ही मदत फार मोठी नाही. हा समस्येवरचा तोडगा नाही, हे मला माहित आहे. पण हा आशेचा किरण आहे. येणारा काळ चांगला असेन, अशी आशा आहे.’

कोरोनामुळे साऊथ इंडस्ट्रीही ठप्प आहे. या इंडस्ट्रीत रोजंदारीने काम करणारे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशात यशची ही मदत त्यांच्यासाठी मोठी मदत ठरणार आहे.
यशचा ‘केजीएफ-चॅप्टर 2’ (KGF: Chapter 1) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात यश मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या 16 जुलैला प्रदर्शित होणार आहे. कन्नडशिवाय हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम अशा चार भाषांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title – KGF Star यश बेरोजगार मजुरांसाठी कोट्यवधीचे दान ( KGF Star Success 300 Billions donated for unemployed workers )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न

Team webnewswala

Mumuni School of Thoughts तर्फे ‘अर्थ’ पूर्ण व्याख्यानाचे आयोजन

Team webnewswala

‘इंदु की जवानी’ निर्माता रायन स्टीफन चे कोरोनाने निधन

Web News Wala

Leave a Reply