Team WebNewsWala
नाटक शहर

KDMC ची नाटय़गृहांच्या भाडय़ात ७५ टक्के सवलत

KDMC प्रशासनाने नाटय़ व्यावसायिकांना आचार्य अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले नाटय़गृहाच्या मूळ भाडय़ात ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण : करोना काळात नाटय़निर्मात्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने KDMC प्रशासनाने नाटय़ व्यावसायिकांना आचार्य अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले नाटय़गृहाच्या मूळ भाडय़ात ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत येत्या मार्च अखेपर्यंत असेल, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

जागतिक मराठी नाटय़धर्मी निर्माता संघाचे पदाधिकारी व ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी प्रशासनाकडे नाटय़गृह भाडय़ाचा विचार करण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

करोना संसर्गाचे नियम पाळून ५० टक्के आसन क्षमतेवर नाटय़गृह चालविण्यास परवानगी दिली आहे. नाटय़निर्मात्यांचा वाढत जाणारा खर्च, अपुरा प्रेक्षक वर्ग, कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना नियमितचे मानधन देणे, साहित्याची देखभाल, साहित्य खोलीचे भाडे, कलाकार वाहनांची देखभाल नाटक बंद असले तरी करावा लागत आहे.

नाटय़गृहांचे पूर्ण भाडे देणे व्यावसायिकांना अशक्य

अशा अवघडल्या परिस्थितीत नाटय़गृहांचे पूर्ण भाडे देणे व्यावसायिकांना शक्य होणार नसल्याने त्याचा विचार करण्याची मागणी जागतिक मराठी नाटय़धर्मी निर्माता संघाने पालिकेकडे केली होती.

मराठी नाटय़संस्था, नाटय़निर्माते, व्यावसायिक कलाकार, कर्मचारी टिकले पाहिजेत. हा व्यवसायही करोना संसर्ग काळात अटीशर्ती पाळून टिकला पाहिजे. रसिकांचे मनोरंजन झाले पाहिजे. हा विचार करुन पालिका नाटय़गृह व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मार्च २०२१ पर्यंत ३०० रुपये तिकिट दरावर मूळ भाडय़ात ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ज्या नाटकांचे तिकिट दर ३०० रुपयांपेक्षा अधिक असतील त्यांना ही सवलत लागू नसेल, त्यांच्याकडून नियमित भाडे आकारले जाईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना

Team webnewswala

नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात ऑनलाइनच

Web News Wala

गावकऱ्यांनी श्रमदानातून बुजविले नाटे ते जैतापूर पूल पर्यंतच्या रस्त्यावरचे खड्डे

Web News Wala

Leave a Reply