Team WebNewsWala
क्रीडा सिनेमा

अक्षय कुमार च्या ‘पृथ्वीराज’ ला करणी सेनेचा विरोध

बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर आला आहे. या सिनेमाचे नाव आहे, अक्षय कुमार च्या 'पृथ्वीराज' ला करणी सेनेचा विरोध दर्शवत हे टायटल बदलण्याची मागणी

अक्षय कुमार च्या ‘पृथ्वीराज’ ला करणी सेनेचा विरोध

Webnewswala Online Team – करणी सेना (Karni Sena) गतकाळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांविरोधात रस्त्यावर उतरलेली आपण पाहिली आहे, पद्मावत, मणिकर्णिका या सिनेमांविरोधात करणी सेनेने दंड थोपटले होते. आता बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर आला आहे. या सिनेमाचे नाव आहे, अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ ला करणी सेनेचा विरोध दर्शवत हे टायटल बदलण्याची मागणी केली आहे.

सिनेमाचे टायटल बदलण्याची मागणी

करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंह राठोड यांनी सिनेमाचे टायटल बदलण्याची मागणी केलीय. पृथ्वीराज चौहान एक महान योद्धा होते. अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. मग सिनेमाचे नाव ‘पृथ्वीराज’ कसे ? सिनेमाच्या नावातही पृथ्वीराज चौहान यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला जावा आणि त्यांचा आदर करण्यात यावा, असे सुरजीत सिंह यांनी म्हटले आहे.

सिनेमा रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी या सिनेमाचे स्क्रीनिंग 

इतकेच नाही करणी सेनेने या चित्रपटासाठी आणखीही एक अट ठेवली आहे. अक्षयचा हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी या सिनेमाचे स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी अटही त्यांनी ठेवली आहे. मेकर्सनी आमचा सल्ला मानला नाही तर त्यांना वाईट परिणामांचा सामना करावा लागेल. ‘पद्मावत’ सिनेमावेळी संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काय झाले, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा सुरजीत सिंह यांनी दिलाय. दरम्यान यशराज फिल्म्सने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘पृथ्वीराज’ मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये

अक्षय कुमारने 2019 साली त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमाची घोषणा केली होती. ‘वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्या एतिहासिक सिनेमाची घोषणा करताना गर्व वाटतोय. हा सिनेमा माझ्या आतापर्यंतच्या मोठ्या सिनेमांपैकी सर्वात मोठा सिनेमा आहे. पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे,’ असे त्याने घोषणा करताना म्हटले होते.
‘पृथ्वीराज’ मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर झळकणार आहे. मानुषीचा हा डेब्यू सिनेमा आहे. या सिनेमात ती पृथ्वीराज चौहान यांची पत्नी संयुक्ता यांची भूमिका साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा सिनेमा आदित्य चोप्राची निर्मिती आहे. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात सोनू सूद आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title – अक्षय कुमार च्या ‘पृथ्वीराज’ ला करणी सेनेचा विरोध ( Karni Sena opposes Akshay Kumar’s ‘Prithviraj’ )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

2021 मध्ये रिलीज होणार ‘हे’ 10 बिग बजेट चित्रपट

Team webnewswala

IPL 2021 सप्टेंबरमध्ये होणार दुबईत

Web News Wala

IPL धमाका 19 सप्टेंबरपासून, बीसीसीआय सज्ज

Team webnewswala

Leave a Reply