Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्राईम

बलुचिस्तान हक्कांसाठी लढणाऱ्या करिमा बलोच यांची हत्या

बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढणाऱ्या करिमा बलोच यांची हत्या करण्यात आली. करिमा यांचा मृतदेह टोरंटोमध्ये नदी किनारी आढळला.

टोरंटो : बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढणाऱ्या करिमा बलोच यांची हत्या करण्यात आली. करिमा यांचा मृतदेह टोरंटोमध्ये नदी किनारी आढळला. मृतदेहाची ओळख करिमा यांचे पती हम्माल हैदर (Hammal Haider) यांनी पटवली. पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मृतदेहाचा ताबा करिमा यांचे पती हम्माल हैदर यांच्याकडे दिला जाईल. करिमा यांच्या हत्येप्रकरणी तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. (activist karima baloch found dead in toronto)

करिमा बलोच या बलोच विद्यार्थी संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. त्या बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढत होत्या. पाकिस्तानचे सरकार आणि पाकिस्तानचे लष्कर यांच्या विरोधक अशी त्यांची ओळख होती. संयुक्त राष्ट्रे येथे बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित करण्याचे काम करिमा बलोच केले. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचे लष्कर बलुचिस्तानमधील नागरिकांच्या मानवाधिकारांची पायामल्ली करत आहे हा आरोप त्यांनी ठामपणे संयुक्त राष्ट्रांसमोर बोलताना केला.

बलोच विद्यार्थी संघटनेच्या (Baloch Student Organization – BSO) अध्यक्ष

बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जाहिद बलूच यांचे अपहरण झाल्यानंतर २०१४ मध्ये करिमा बलोच यांनी बलोच विद्यार्थी संघटनेच्या (Baloch Student Organization – BSO) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी २०१६ मध्ये रक्षाबंधनचे निमित्त साधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला होता. या संदेशात त्यांनी मोदींना भाऊ मानले आणि बलुचिस्तानच्या मानवी हक्कांची पायामल्ली करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यास मदत करावी, अशी मागणी केली होती.

बलुचिस्तानमध्ये राहणारे नागरिक इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यलढा लढले होते. या लढ्यात बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला. पण भारताची फाळणी झाली. काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली आणि बलुचिस्तान कायमचे पाकिस्तानच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट झाले. पाकिस्तान सरकारच्या नेतृत्वात राहणे कठीण असल्याची जाणीव असल्यामुळे बलुचिस्तानने स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला. पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानचा संघर्ष मोडून काढण्यासाठी लष्करी बळाचा वापर सुरू केला. यानंतर काही नेत्यांनी पाकिस्तानपासून दूर राहून संघर्ष सुरू ठेवला.

बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक

करिमा बलोच पाकिस्तानपासून दूर राहून बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक होत्या. त्यांची हत्या झाल्यामुळे बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. बलूच नॅशनल मुव्हमेंट (Baloch National Movement) या संघटनेने ४० दिवसांचा शोक जाहीर केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी तीन वाजता करिमा बलोच यांना शेवटचे बघितल्याची माहिती हाती आली आहे. यानंतर कोणीही करिमा बलोच यांना बघितल्याचे पोलिसांना सांगितलेले नाही. घरच्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी करिमा बलोच बेपत्ता असल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांना फोटो प्रसिद्ध करुन शोध घेण्यासाठी मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. अखेर टोरंटोमध्ये नदी किनारी करिमा बलोच यांचा मृतदेह आढळला.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नाईट क्लब मध्ये Social Distancing च्या नियमांचा भंग

Team webnewswala

IPL धमाका 19 सप्टेंबरपासून, बीसीसीआय सज्ज

Team webnewswala

सचिन तेंडुलकर कडून गोल्फ साठी कोरोना नियमांचं उल्लंघन ?

Web News Wala

Leave a Reply