Team WebNewsWala
शहर समाजकारण

जितेंद्र शिर्के भारतीय मराठा कल्याण संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी

राज्यभरात मराठा समाज एक होण्याकरिता संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख पदी शिर्के यांची निवड करण्यात आली.

ठाणे : मराठा समाजाच्या विकासासाठी अग्रेसर असणाऱ्या भारतीय मराठा संघाच्या वतीने राज्यभरात मराठा समाज एक होण्याकरिता संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख पदी जितेंद्र शिर्के यांची निवड करण्यात आली.

सर्व जिल्ह्यात जोरदार सभासद नोंदणी 

मराठा समाज कामाकरिता आपले गाव सोडून शहर परिसरात जास्त प्रमाणात स्थापित झाला आहेत. यामुळे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच मराठा बंधू, भघिणी संघाच्या माध्यमातून विविध मराठा समाजाच्या समस्या सोडविण्याकरिता संघात एकत्र राहणे गरजेचे आहे. यामुळे देशभरात भारतीय मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाची योग्य रित्या बांधणी सुरू असून मूळ हेतू मराठा समाजाचा विकास हाच असल्याने जोरदार सभासद नोंदणी सर्व जिल्ह्यात होत आहे.

कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख पदी जितेंद्र शिर्के यांची निवड

यामुळे कल्याण शहर तसेच ग्रामीण परिसरात देखील मराठा समाज एकत्र राहण्याकरिता तसेच समाज बांधवांच्या समस्या सोडवण्याकरिता संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाशजी पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख पदी जितेंद्र शिर्के यांची निवड करण्यात आली. यावेळी संघाचे सरचिटणीस राजेंद्र पालांडे, प्रदेश उपाध्यक्ष आनंद संकपाळ, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, प्रसिध्दी प्रमूख अमोल कदम, ठाणे- पालघर जिल्हा संपर्क प्रमूख विनोद जाधव आदी उपस्थित होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नृत्यदिगदर्शक साहिल शाह यांची राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

Team webnewswala

मुंबईत येणार चालक विरहित मेट्रो

Web News Wala

आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा कहर

Team webnewswala

Leave a Reply