Other व्यापार

10 कोटी स्मार्टफोन आणत Jio करणार फोन मार्केटवर कब्जा

टेलिकॉम सेक्टरमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता Jio डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंत भारतात 10 कोटी स्मार्टफोन आणत फोन मार्केट वर कब्जा करण्याची शक्यता आहे.

टेलिकॉम सेक्टरमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता रिलायन्स जिओ स्मार्टफोनच्या बाजारात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. कारण, रिलायन्स जिओ डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंत भारतात 10 कोटी स्मार्टफोन आणत Jio करणार फोन मार्केटवर कब्जा करण्याची शक्यता आहे.

बिजनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ डिसेंबर अखेरपर्यंत 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्वस्त 4जी स्मार्टफोन गुगल अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला फोन कंपनी लाँच करु शकते, असं या वृत्तामध्ये म्हटलं आहे. 

गुगल आणि जिओच्या या स्वस्त 4 जी स्मार्टफोनमुळे शाओमी, ओप्पो, व्हिवो, सॅमसंग आणि नोकिया यांसारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळणार आहे.

जिओचा हा 4G फोन गुगलसोबत भागीदारीअंतर्गत लाँच होण्याची शक्यता

काही महिन्यांपूर्वीच गुगलने जिओमध्ये 4.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गुगल एक स्वस्त अँड्रॉइड व्हर्जनवर काम करत असून, याच व्हर्जनमध्ये कंपनी 10 कोटी स्मार्टफोन आणत Jio करणार फोन मार्केटवर कब्जा करेल असं जुलै महिन्यात जिओकडून सांगण्यात आलं होतं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Youtube hacking चा फटका कॅरी मिनाटी ला

Team webnewswala

पहिल्याच दिवशी मेट्रोला कमी प्रतिसाद

Team webnewswala

मंदीत Smartphone मार्केटमध्ये चांदी

Web News Wala

Leave a Reply