Team WebNewsWala
ठळक बातम्या तंत्रज्ञान

Jio Phone New feature आता करा whatsapp कॉलिंग

Jio Phone New feature आता व्हाट्सअ‍ॅप व्हॉइस कॉलिंग फीचर Jio Phone आणि Jio Phone 2 फीचर फोनसाठी उपलब्ध झाली आहे.

Jio Phone New feature आता करा whatsapp कॉलिंग

Webnewswala Online Team – Jio Phone मध्ये 2018 पासून व्हाट्सअ‍ॅप वापरता येत होते परंतु, या फोनमधून व्हाट्सअ‍ॅप व्हॉइस कॉलिंग मात्र करता येत नव्हती. फक्त Jio Phone नव्हे तर KaiOS असलेल्या अनेक स्मार्ट फिचर फोन्समध्ये हे फिचर उपलब्ध नव्हते. परंतु, आता व्हाट्सअ‍ॅप व्हॉइस कॉलिंग फीचर Jio Phone आणि Jio Phone 2 आणि KaiOS वर चालणाऱ्या इतर सर्व फीचर फोनसाठी उपलब्ध झाली आहे.

हे नवीन फीचर व्हॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे VoIP टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. हे फीचर वापरण्यासाठी सक्रिय वाय-फाय किंवा मोबाईल डेटा असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम KaiOS वापरणाऱ्या युजर्सना WhatsApp च्या 2.2110.41 व्हर्जनवर अपडेट करावे लागेल, त्यानंतरच त्यांना हे फिचर उपलब्ध होईल. तसेच चॅटमधील ऑप्शन्समध्ये जाऊन त्या व्यक्तीला कॉल करता येईल. तसेच ज्याप्रकारे नेहमीचे कॉल्स घेता येतात, त्याप्रमाणे व्हाट्सअ‍ॅप कॉल देखील उचलता येतील.

Jio 5G ची तयारी

4G नंतर भारतात लवकरच जियो 5G येणार अश्या बातम्या गेले अनेक दिवस येत आहेत. कंपनी 5जी टेक्नॉलॉजीवर काम करत असल्याची माहिती देखील जियोने दिली आहे. यासाठी Jio ने 22 सर्कल्समध्ये स्पेक्ट्रमची खरेदी पण केली आहे. परंतु, हि सेवा कधी लाँच होईल याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Web Title – Jio Phone New feature आता करा whatsapp कॉलिंग  ( Jio Phone will have a new feature )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू

Web News Wala

WhatsApp New Feature : Multiple Device Login होणार सुरू

Web News Wala

फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंग सुविधा

Team webnewswala

1 comment

Jio Phone New feature आता &#2... June 13, 2021 at 9:49 am

[…] Jio Phone New feature आता व्हाट्सअ‍ॅप व्हॉइस कॉलिंग फीचर Jio Phone आणि Jio Phone 2 फीचर फोनसाठी उपलब्ध झाली आहे.  […]

Reply

Leave a Reply