Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान शिक्षण

रिलायन्सची थ्रीडी जिओ ग्लास ची व्हर्च्युअल क्लासरूम

Jio Glass entry: Reliance's 3D virtual classroom

रिलायन्सच्या जिओने मिक्स्ड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित असणारे जिओ ग्लास हे स्मार्ट ग्लास बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

रिलायन्सची आज ४३ वी सर्वसाधारण बैठक व्हर्च्युअल या प्रकारात आयोजित करण्यात आली. यात कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केला.

जिओ ग्लास मिक्स्ड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानावर आधारित

यात जिओ ग्लास हे नवीन उपकरण बाजारपेठेत सादर करण्यात येणार असल्याची घोषणा लक्षवेधी ठरली. जिओ ग्लास हा संमीश्र सत्यता म्हणजेच मिक्स्ड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात वास्तव आणि आभास याचा बेमालूम मिलाफ करण्यात आलेला आहे.

जिओ ग्लास हे फक्त ७५ ग्रॅम वजनाचे आहेत. याच्या मदतीने कुणीही त्रिमीती म्हणजेच थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नसणार्‍या ठिकाणी असल्याची अनुभूती घेऊ शकतो. याच्या सोबत एक वायर देण्यात आली असून याच्या मदतीने या गॉगलला स्मार्टफोन अटॅच करता येतो.

Jio Glass entry: Reliance's 3D virtual classroom

जिओ ग्लासवर २५ अ‍ॅप्सचा सपोर्ट

सध्या जिओ ग्लासवर २५ अ‍ॅप्सचा सपोर्ट दिलेला असला तरी ही संख्या लवकरच वाढविण्यात येणार आहे. याच्या मदतीने थ्रीडी तसेच होलोग्राफीक तंत्रज्ञानांवर आधारित सेवांचा वापर करता येणार आहे. याचा सर्वात जास्त वापर हा शिक्षण क्षेत्रात होऊ शकतो.

सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे लॉकडाऊन सुरू असून बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करावा लागत आहे. यासाठी झूमसह अन्य अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर करण्यात येत असला तरी याला अनेक मर्यादा असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

नेमक्या याच ठिकाणी जिओ ग्लास उपयोगात येणार आहे. याच्या मदतीने कुणीही विद्यार्थी हा क्लासमध्ये नसतांना वर्गातच असल्याचा फिल घेऊ शकतो.

या माध्यमातून रिलायन्स जिओने थ्रीडी व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यात विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम हा अतिशय मनोरंजक आणि इमर्सिव्ह या पध्दतीत शिकता येणार आहे.

खरीखुरी वाटणारी आभासी सैर

उदाहरणार्थ एखाद्या वर्गात ताजमहालासारख्या ठिकाणाची माहिती दिली जात असतांना विद्यार्थ्यांना ताजमहालाची अगदी खरीखुरी वाटणारी आभासी सैर देखील घडविता येणार आहे. यात थ्रीडी आणि होलोग्राफीचा वापर केला असल्याने हे उपकरण अन्य क्षेत्रांमध्येही उपयुक्त ठरू शकते. सध्या तरी याचे मूल्य जाहीर करण्यात आले नसले तरी ते किफायतशीर असेल असा अंदाज आहे.

जिओ ग्लासच्या मदतीने थ्रीडी अवतार तयार करून याच्याशी इंटरअ‍ॅक्ट करता येणार आहे. यात दोन अवतार एकमेकांशी संवाद साधू शकणार आहेत. तसेच यात अतिशय दर्जेदार ध्वनीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ग्लासच्या मदतीने युजर संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल देखील करू शकणार आहे. यात होलोग्राफीक कॉलींगचाही समावेश असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले संबोधित केल्या अनेक घोषणा

Team webnewswala

अमेरिका, चीन आणि रशियाच्या चांद्र मोहिम स्पर्धेत जपान ची उडी

Web News Wala

नैराश्यावर मात करा एक मिनिटाच्या फिल्ममध्ये उपाय

Team webnewswala

1 comment

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत चौथी व्यक्ती - Web News Wala August 9, 2020 at 6:01 pm

[…] – तब्बल 22 अब्ज डॉलर्सची संपत्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी […]

Reply

Leave a Reply