Team WebNewsWala
शहर समाजकारण

महाराष्ट्रात 26 जानेवारीपासून ‘जेल टुरिझम’ ची सुरुवात

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh, home minister, maharashtra) यांनी राज्य सरकारच्यावतीने 'जेल टुरिझम' ची घोषणा केली.
महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनापासून ‘जेल टुरिझम’ ची सुरुवात होणार

भारतीयांनी तयार केलेले संविधान भारताने स्वीकारले, देशात कायद्याचे राज्य आले. नागरिकांची म्हणजे प्रजेची सत्ता आली. या घटनेचे स्मरण करुन हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून प्रजासत्ताक दिन या नावाने साजरा करतात. या दिवसाचे औचित्य साधून नागरिकांना जेलमध्ये घेऊन जाणार, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

पुण्याच्या येरवडा सेंट्रल जेलमधून सुरू होणार ‘जेल टुरिझम’

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh, home minister, maharashtra) यांनी राज्य सरकारच्यावतीने ‘जेल टुरिझम’ची घोषणा केली. या टुरिझमची सुरुवात २६ जानेवारी रोजी पुण्याच्या येरवडा सेंट्रल जेल अर्थात येरवडा मध्यवर्ती कारागृह (Yerawada Central Prison or Yerawada Central Jail) येथून होईल. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी आणि नागरिक येरवडा जेलमधील ऐतिहासिक जागांना भेट देतील.

ऐतिहासिक ठिकाणं बघण्याची संधी नागरिकांना मिळणार

इंग्रजांच्या काळात लोकमान्य टिळक, गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिक येरवडा कारागृहात होते. इंग्रजांनी वेगवेगळ्या कारणांनी स्वातंत्र्यसैनिकांना कैद करुन येरवडा कारागृहात ठेवले होते. ही सर्व ठिकाणं बघण्याची संधी जेल टुरिझमच्या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे.

कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन सुरू होणार ‘जेल टुरिझम’

जेल संदर्भात नागरिकांना माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक पुस्तिका अर्थात गाइड तयार केले जाणार आहे. येरवडा जेलच्या प्रवेशद्वाराजवळ या गाइडची विक्री केली जाईल. गाइडची किंमत किमान पाच ते कमाल ५० रुपये असू शकते, असे सूतोवाच सरकारी यंत्रणेने केले आहे. कोविड प्रोटोकॉलचे (covid protocol) बंधन घालून दररोज ५० पर्यटकांना येरवडा जेल बघण्याची संधी दिली जाईल. लवकरच राज्यातील इतर जेलमध्ये ‘जेल टुरिझम’ सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे संकेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. ठाणे (thane), नाशिक (nashik) आणि रत्नागिरी (ratnagiri) या जेललाही प्रचंड ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणीही ‘जेल टुरिझम’ सुरू होणार असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

फटाके बंदी मुळे यावर्षी मुंबईमध्ये प्रदुषणात घट

Team webnewswala

एमएसआरटीसीच्या सार्वजनिक बससेवा आता कॅशलेश

Team webnewswala

केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स

Team webnewswala

Leave a Reply