Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय क्रीडा

IPL धमाका 19 सप्टेंबरपासून, बीसीसीआय सज्ज

IPL 2021 वेळापत्रकात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिन जय शहा हे दुबईला गेले आहेत.

आयसीसीकडून ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आल्यानंतर बीसीसीआयच्या IPL स्पर्धा आयोजनाच्या हालचालींना वेग आला.

आता आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे की, 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार असून आठ नोव्हेंबरला जेतेपदाचा पैसला होणार आहे. 51 दिवसांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे.

IPL blast from September 19, BCCI ready

हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलियन दौर्यामध्ये बाधा येऊ नये यासाठी IPL स्पर्धा 26 सप्टेंबरऐवजी एक आठवडे आधी म्हणजेच 19 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्याची बीसीसीआय वाट बघत आहे.

पुढच्या आठवडय़ात वेळापत्रक निश्चित होणार
बीसीसीआयकडून सर्व प्रकारची माहिती आयपीएलशी निगडीत सर्वांना देण्यात आली असून आता आयपीएल गव्हार्ंनग काऊंसिलची बैठक पुढील आठवडय़ात होणार आहे.

या बैठकीत आयपीएलच्या स्वरूपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर हा कालावधीत प्रेंचायझी, ब्रॉडकास्टरसह आदी सर्वांसाठी उपयुक्त असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.

शनिवार – रविवारी प्रत्येकी दोन लढती होणार

आयपीएलच्या नव्या वेळापत्रकानुसार शनिवार व रविवारी प्रत्येकी दोन सामने आयोजित करण्यात येणार आहेत. 51 दिवसांमध्ये 12 वेळा दुहेरी लढती खेळवण्यात येतील. दरम्यान आयपीएलसाठी प्रत्येक संघ 20 ऑगस्ट रोजी युएईत पोहोचणार आहे. जेणेकरून त्यांना सरावासाठी किमान एक महिना मिळू शकेल.

तीन ग्राऊंड लढतींसाठी उपलब्ध

युएईत तीन स्टेडियम्स आहेत. यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबुधाबी व शारजाह यांचा समावेश आहे. येथे लढती होण्याची शक्यता आहे. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी ठेवायची की नाही याचा निर्णय युएईतील सरकार घेईल असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. आयसीसीची ऍकॅडमी खेळाडूंना ट्रेनिंगसाठी उपलब्ध करून दिली जाईल.

IPL blast from September 19, BCCI ready

ऑस्ट्रेलियन सरकारच्या नियमामुळे बदल
याआधी आयपीएलला 26 सप्टेंबरपासून सुरूवात करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत होते. पण त्यामुळे ऑस्ट्रेलियन दौरा अडचणीत येणार होता. कारण ऑस्ट्रेलियन सरकारच्या नियमामुळे. या नियमानुसार हिंदुस्थानी संघाला ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. यामुळेच हिंदुस्थानी संघ काही दिवस आधीच ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचणार आहे. तीन डिसेंबरपासून हिंदुस्थान – ऑस्ट्रेलियामधील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ब्रिस्बेनमध्ये सुरूवात होणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | इंस्टाग्राम | youtube | ट्विटर | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

प्रगतिशील शेतकऱ्यांकडून ऑर्किड लागवडीचा प्रयोग यशस्वी

Team webnewswala

बलुचिस्तान हक्कांसाठी लढणाऱ्या करिमा बलोच यांची हत्या

Web News Wala

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती

Team webnewswala

1 comment

संपुर्ण सोसायटीचे बिल लावले काय ? हरभजन सिंग चा सवाल - Web News Wala July 27, 2020 at 7:01 pm

[…] आयपीएलचा धमाका 19 सप्टेंबरपासून, बीसीस… […]

Reply

Leave a Reply