Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्रीडा

IPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार

IPL 2021 Update आयपीएल 2021 च्या उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयनं 31 सामन्यांच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरातीची निवड केली.

IPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार

Webnewswala Online Team – IPL 2021 Update Remaining matches : आयपीएल 2021च्या उर्वरित सामने खेळवण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. बीसीसीआयनं 31 सामन्यांच्या आयोजनासाठी संयुक्त अरब अमिरातीची निवड केली आणि तशी अधिकृत घोषणाही केली आहे. सोमवारी बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत आयपीएलचे सामने खेळवण्यात येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येईल. पण, आता आयसीसीने बीसीसीआयला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. InsideSport.co ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयला 10 ऑक्टोबरपर्यंतचीच मुदत आयसीसीकडून मिळणार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अडचणी वाढणार आहेत.

आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार

आयपीएल 2021चे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर या विंडोत यूएईत होतील अशी घोषणा बीसीसीआयनं मागील महिन्यात केली होती. 29 मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आणि त्याचवेळी बीसीसीआयनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनसाठी आयसीसीकडे जून अखेरपर्यंत वेळ मागितला आहे. आयपीएल पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय सर्व प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या अधिकाऱ्यांशी यूएईत जाऊन भेट घेतली आहे. मागील 10 दिवसांत बीसीसीआयनं अनेक क्रिकेट मंडळांशीही चर्चा केली आहे, परंतु InsideSport.coनं दिलेल्या वृत्तानुसार 10 ऑक्टोबरनंतर एकही दिवस वाढवून देण्यास आयसीसीचा नकार आहे.

“ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे आणि अशात 15 ऑक्टोबरपर्यंत आयपीएल कशी खेळवली जाऊ शकते?, आयसीसी त्याला परवानगी देणे शक्य नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना संघ 15 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्यास कसे काय परवानगी देतील? त्यामुळे बीसीसीआयला 10 ऑक्टोबरपलिकडे वेळ देण्याची शक्यता कमी आहे,” असे सूत्रांनी सांगितले.

जूलै 2020 मध्ये आयसीसीनं जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ऑक्टोबरच्या मध्यंतरापासून ते 14 नोव्हेंबरपर्यंत ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येईल, असे म्हटले गेले होते. पण, आयसीसीनं अद्यापही संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेलं नाही.

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी श्रीलंकेचा पर्याय

ANI नं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनासाठी श्रीलंकेकडे विचारणा करत आहे. आयसीसीच्या नियमानुसार मोठ्या स्पर्धेच्या आयोजनापूर्वी तेथील स्टेडियम 15 दिवस आधी ताब्यात देणे आवश्यक आहे. अशात आयपीएल यूएईत झाल्यास ते शक्य होणार नाही. त्यामुळेच बीसीसीआय हा दुसरा पर्याय शोधत आहे.

Web Title – IPL 2021 Update आयपीएलचा दसऱ्याचा मुहूर्तही चुकणार ( IPL 2021 update will miss the Dussehra moment of IPL )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Tokyo Olympics खेळाडूंना वाटणार १ लाख ६० हजार Condoms

Web News Wala

बेरोजगारांना आठवड्याला २२ हजार तर गरजूंना ४४ हजार

Web News Wala

स्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा

Team webnewswala

Leave a Reply