Team WebNewsWala
अर्थकारण राष्ट्रीय

अर्थसंकल्पानंतर महागाई; LPG सिलिंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, गुरुवारी पेट्रोल डिझेलच्या दरवाढ करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पानंतर महागाई; LPG सिलिंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, गुरुवारी पेट्रोल डिझेलच्या दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रतिलिटर तर डिझलेचे दर 83.67 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तर एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत 710 रुपये 14 किलोग्रॅमच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत. यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

मुंबईत पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रतिलिटर तर डिझलेचे दर 83.67 रुपये प्रतिलिटर

मुंबईत पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रतिलिटर तर डिझलेचे दर 83.67 रुपये प्रतिलिटर

अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार

अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्यात आला होता. मात्र, या अधिभाराचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, अर्थसंकल्पानंतर दोनच दिवसांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीत 14 किलोग्रॅमच्या सिलिंडरसाठी 719 रुपये प्रतिसिलिंडर मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 745.50 रुपये प्रतिसिलिंडर, चेन्नईत 745.50 रुपये तर मुंबईत 710 रुपये प्रतिसिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत.

तर मुंबईत 710 रुपये 14 किलोग्रॅमच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, गुरुवारी पेट्रोल डिझेलच्या दरवाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ केली आहे. राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल 86.65 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 76.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रतिलिटर तर डिझलेचे दर 83.67 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. चेन्नईत पेट्रोल 89.13 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 82.04 रुपये प्रतिलिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 88.01 तर डिझेल 80.41 रुपये झाले आहे.

या वर्षात सुरुवातीलाच पेट्रोल डिझलेच्या दरांनी गाठला उच्चांक 

2021 या वर्षात पेट्रोल डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहे. या वर्षात सुरुवातीलाच पेट्रोल डिझलेच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे महागाई वाढण्याचे संकेत मिळत आहेत. पेट्रोल डिझलेची दरवाढ झाल्याने त्याचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होतो. त्यामुळे महागाईतही वाढ होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

करोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह

Team webnewswala

‘TCS’ची पात्रता परीक्षा ION आता सर्वांसाठी खुली

Team webnewswala

Mera Ration app घरबसल्या बघा तुमच्या रेशनकार्ड किती धान्य मिळणार

Web News Wala

Leave a Reply