Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय क्रीडा

लवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा – BCCI

लवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा १-१० नोव्हेंबरमध्ये होऊ शकतं आयोजन– BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती
लवकरच भारतीय महिला IPL ची घोषणा १-१० नोव्हेंबरमध्ये होऊ शकतं आयोजन– BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती

हरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. परंतू अनेक भारतीय महिला खेळाडूंना असणारा कमी अनुभव यामुळे अद्याप महिला संघाला एकाही महत्वाच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही.

२०२० सालात फेब्रुवारी महिन्यात हरमनप्रीत कौरचा भारतीय संघ महिला टी-२० विश्वचषकात उप-विजेता ठरला होता.

Indian Women's IPL announced - BCCI

अनेक भारतीय महिला खेळाडूंनी आयपीएलसारख्या स्पर्धेची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानेही महिला खेळाडूंसाठी आयपीएलची घोषणा लवकरच होईल अशी माहिती दिली आहे.

“मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगू शकतो की महिलांसाठी आयपीएलवरही आमचा विचार सुरु आहे, लवकरच याची घोषणा होईल. भारतीय महिला संघासाठीही आम्ही काही प्लान आखले आहेत.” गांगुलीने पीटीआयला माहिती दिली.

सध्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला सौरव गांगुली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. या कारणासाठी गांगुलीने याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला.

Indian Women's IPL announced - BCCI

१ ते १० नोव्हेंबरदरम्यान महिला खेळाडूंसाठी चॅलेंजर सिरीजचं ( भारतीय महिला IPL )

परंतू बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १ ते १० नोव्हेंबरदरम्यान महिला खेळाडूंसाठी चॅलेंजर सिरीजचं ( भारतीय महिला IPL ) आयोजन केलं जाऊ शकतं.

सध्या बीसीसीआयचं क्रिकेट ऑपरेशन्स विभाग भारतीय महिला संघासाठी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांसोबत मर्यादीत षटकांची मालिका आयोजित करण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.

त्यामुळे भविष्यकाळात बीसीसीआय महिला आयपीएलबद्दल काय घोषणा करतं याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असेल.

बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मंगळावर यान पाठवणारा पहिला मुस्लीम देश ठरला UAE

Team webnewswala

अमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका

Team webnewswala

पालघर-सफाळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था

Team webnewswala

Leave a Reply