Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय व्यापार

बाटाच्या ग्लोबल सीईओ पदी संदीप कटारिया

संदीप कटारिया बाटाचे ग्लोबल सीईओ झाले.बाटाच्या ग्लोबल सीईओपदी पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीची निवड झाली.

नवी दिल्ली: सरप्राइजिंगली बाटा‘ ही नवी संकल्पना घेऊन बाटा या आंतरराष्ट्रीय चप्पल-बूट कंपनीला अल्पावधीत आणखी मोठे करणाऱ्या भारतीय व्यक्तीला कंपनीने नवी जबाबदारी दिली. संदीप कटारिया बाटाचे ग्लोबल सीईओ झाले.बाटाच्या ग्लोबल सीईओपदी पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीची निवड झाली.

संदीप कटारिया २०१७ मध्ये बाटा कंपनीत दाखल झाले. त्यांनी ‘बाटा इंडिया‘चे नेतृत्व करत ‘सरप्राइजिंगली बाटा‘ ही नवी संकल्पना राबवली. नव्या स्वरुपातल्या बाटाच्या जाहिरातबाजीने कंपनीची प्रतिमा आणखी मोठी झाली. एकेकाळी फक्त परवडणाऱ्या दरातील चप्पल, बूट, सँडल, शाळांचे कॅनव्हासचे बूट, पावसाळी चप्पल-बूट यांच्यासाठी भारतात बाटा कंपनीची ख्याती होती.

सरप्राइजिंगली बाटा

‘सरप्राइजिंगली बाटा’ ही संकल्पना घेऊन संदीप कटारिया यांनी बाटा कंपनीला नवी ओळख मिळवून दिली. आता परवडणाऱ्या दरातील चप्पल, बूट, सँडल यांच्या बरोबबरीने पार्टी, लग्न समारंभ अशा मोठ्या सोहळ्यांमध्ये मिरवण्यासाठी महागडे चप्पल-बूट तसेच फिटनेसची काळजी करणाऱ्यांसाठी, पायांना आराम मिळावा यासाठी शोध घेणाऱ्यांकरिता आणि पायांना अॅक्युप्रेशर करण्यासाठीही आकर्षक चप्पल-बुटांचे पर्याय बाटा कंपनीने उपलब्ध केले आहेत.

दैनंदिन वापराच्या चप्पल-बुटांपासून भव्य सोहळ्यांमध्ये मिरवायच्या चप्पल-बुटांसाठीचा सर्वोत्तम आणि विश्वासार्ह ब्रँड अशी बाटा कंपनीची ख्याती झाली आहे. 

संदीप कटारिया बाटाचे ग्लोबल सीईओ

कटारिया यांनी ‘बाटा इंडिया’ चे नेतृत्व करत ‘सरप्राइजिंगली बाटा’ ही नवी संकल्पना राबवली. यामुळे कंपनीचा व्यवसाय, उत्पन्न आणि नफा यात सातत्याने वाढ झाली. कटारिया यांच्या कार्यकाळात झालेल्या फायद्यांची दखल घेत बाटा या आंतरराष्ट्रीय चप्पल-बूट कंपनीने पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीला कंपनीने नवी जबाबदारी दिली. संदीप कटारिया बाटाचे ग्लोबल सीईओ झाले. बाटा इंडिया कंपनीचे चेअरमन अश्विनी विंडलस यांनी कटारिया यांचे अभिनंदन केले. कटारिया यांच्या नेतृत्वात बाटा ही आंतरराष्ट्रीय चप्पल-बूट कंपनी यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सीईओपदी भारतीय व्यक्ती

कटारिया हे ४९ वर्षांचे आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, अल्फाबेटचे सुंदर पिचाई, मास्टरकार्डचे अजय बंगा, आयबीएमचे अरविंद कृष्णा, रेकिट बेन्किजरचे लक्ष्मण नरसिम्हन यांच्या यादीत संदीप कटारिया यांचा समावेश झाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांमध्ये संदीप कटारिया हे आणखी एक नाव कौतुकाने आणि आदराने घेण्यास सुरुवात झाली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही Home Quarantine

Team webnewswala

नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

Team webnewswala

सणासुदीच्या कालावधीत मोबाईल, कपड्यांची खरेदी जोरात

Team webnewswala

Leave a Reply