Team WebNewsWala
तंत्रज्ञान व्यापार

चिनी स्मार्टफोनला भारतीय Lava ची टक्कर

Indian ‘Lava’ hits Chinese smartphone
जाणून घ्या फिचर्स

काही दिवसांपूर्वी भारतानं चीनच्या काही अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तसंच गलवान खोऱ्यात भारत आणि चीनदरम्यान झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी भावनाही जोर धरू लागली होती.

त्यानंतर देशात चीन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली होती. अशा परिस्थितीत मोबाईलच्या बाजारात आता चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी इतर कंपन्यांनीही कंबर कसण्यास सुरूवात केली आहे.

Indian Lava hits Chinese smartphones

भारतीय स्मार्टफोन कंपनी Lava नं चीनच्या मोबाईल कंपनीला टक्कर देण्यासाठी बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

लावानं Lava Z66 नुकताच भारतात लाँच केला. हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवरून विकत घेता येणार आहे.

Indian Lava hits Chinese smartphones

लावाच्या Lava Z66 या सध्या केवळ एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

तसंच हा फोन लाल आणि निळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

अधिकृत वेबसाईटवर सध्या या मोबाईलबाबत कोणती माहिती उपलब्ध नाही. फ्लिपकार्टवर याची किंमत ७ हजार ८९९ रुपये

 

Indian Lava hits Chinese smartphones
स्पेसिफिकेशन आणि फिचर्स

लावाच्या या लो बजेट स्मार्टफोनमध्ये ६.०८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच त्याचं स्क्रिन रिझॉल्युशन १५६०*७२० पिक्सेल इतकं असून १९:९ आस्पेक्ट रेशो देण्यात आहे.

याव्यतिरिक्त फोनमध्ये २.५ डी कर्व्ह्ड स्क्रिन आहे. तसंच या मोबाईलमध्ये १.६ गेगाहर्ट्झचा octa-core Unisoc प्रोसेसर देण्यात आला आहे.

Indian Lava hits Chinese smartphones

याव्यतिरिक्त मोबाईलमध्ये स्टोरेजदेखील वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या सहाय्यानं १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी या मोबाईलमध्ये १३ मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि ५ मेगापिक्सेलचा सेकंडरी असा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

तसंच त्यामध्ये ब्युटी मोड, एचडीआर मोड. पॅनोरमा, नाईट मोड, टाईम लॅप्स, स्लोमोशन आणि फिल्टर्सही देण्यात आले आहे. सेल्फीच्या चाहत्यांसाठी या मोबाईलमध्ये १३ मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेराही देण्यात आला आहे. तसंच या मोबाईलमध्ये ३,९५० एमएएची बॅटरीही देण्यात आली आहे.

हे ही वाचा
सॅमसंग चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय
अ‍ॅपलची मोठी घोषणा! ‘आयफोन’ मधील ‘I’ आता India
नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर
५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Bajaj Auto ने बंद केली Bajaj Chetak इलेक्ट्रिक ची बूकिंग

Team webnewswala

देशातील सर्वात महागडी भाजी किंमत प्रति किलो हजारोच्या घरात

Team webnewswala

WhatsApp ला पर्याय Signal App चा

Web News Wala

1 comment

शाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी - Team WebNewsWala September 20, 2020 at 8:26 pm

[…] चिनी स्मार्टफोनला भारतीय ‘लावा’ची टक… […]

Reply

Leave a Reply