Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय व्यापार

startup मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर

गेल्या १८० दिवसात म्हणजे सहा महिन्यात १० हजार नवीन Startup नोंदले गेले असून त्यात अन्न प्रक्रिया, उत्पादन विकास, App डेव्हलपमेंट, आयटी कन्सल्टन्सी यांची संख्या अधिक

startup मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर

दिल्ली – जागतिक अहवालानुसार भारतात (India stands on third position in startups worldwide) नव्याने सुरू होत असलेल्या कंपन्यांमध्ये startup कंपन्यांची टक्केवारी ६ ते ७ टक्के आहे. गेल्या एक दशकात ही वाढ झाली आहे. 

युनिकॉर्न स्टार्टअप यादीत अमेरिका, चीन पाठोपाठ आता भारत तिसऱ्या क्रमांकावर

युनिकॉर्न स्टार्टअप यादीत अमेरिका, चीन पाठोपाठ आता भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंट फर्म क्रेडिट सुइसच्या अहवालातून ही माहिती समोर आली.

ज्याचे भांडवली मूल्य एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक असते त्यांना युनिकॉर्न स्टार्टअप म्हणतात. एक अब्ज डॉलरपेक्षा (७.३ हजार कोटी रुपये) अधिक भांडवली मूल्य असलेल्या ३८६ नोंदणीकृत कंपन्यांच्या तुलनेत भारतात १०० युनिकॉन असून त्यांचे संयुक्त भांडवली मूल्य १७.३ लाख कोटी रुपये आहे.

देशातील प्रमाण ६ ते ७ %

अहवालानुसार भारतात नव्याने सुरू होत असलेल्या कंपन्यांमध्ये स्टार्टअप कंपन्यांची टक्केवारी ६ ते ७ टक्के आहे. गेल्या एक दशकात ही वाढ झाली आहे. भारतात १०० युनिकॉर्न वेगेवगळ्या प्रकारच्या कंपनीत असून ज्यात तंत्रज्ञान आणि त्यासंबंधित क्षेत्र, फार्मास्युटिकल, बायोटेक, कंझ्यूमर गुड्सचा समावेश आहे. यात अधिकांश कंपन्या २००५ नंतर स्थापन झाल्या आहेत.

युनिकॉर्नच्या दृष्टीने बंगळुरू सर्वात मोठे शहर असून त्यानंतर दिल्ली आणि मुंबईचा क्रमांक आहे.

सर्वाधिक सक्रिय क्षेत्र

(सेक्टर आणि युनिकॉर्नची टक्केवारी) – फिनटेक १३%

आयटी/टेक १२%

सॉफ्टवेअर १२%

ई-कॉमर्स १०%

हेल्थकेअर ९%

अन्य ४४%

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बिग बास्केट ला खरेदी करत टाटांची रिटेल क्षेत्रात उडी

Web News Wala

अमेरिका, चीन आणि रशियाच्या चांद्र मोहिम स्पर्धेत जपान ची उडी

Web News Wala

टाटा सन्स खरेदी करणार Air Asia चे ३२.६७ टक्के शेअर्स

Web News Wala

Leave a Reply