Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य समाजकारण

CoviShield निर्यात सुरू, ब्राझिलला २ लाख डोस रवाना

जून महिन्यात केंद्राला तब्बल 12 कोटी लस उपलब्ध होणार असल्याची माहिती रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून यामुळे देशभरात अनेक ठिकाणी लसींबाबत सुरू असलेले टेन्शन संपणार आहे.

मुंबईः सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या CoviShield लसच्या दोन लाख डोसची निर्यात ब्राझिलला करण्यात आली आहे. ब्राझिलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून लसची मागणी केली होती.

CoviShield निर्यात सुरू, ब्राझिलला २ लाख डोस रवाना

ब्राझिलमध्ये आतापर्यंत ८६ लाख ९९ हजार ८१४ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी २ लाख १४ हजार २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या बाबतीत ब्राझिल जगात दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक कोरोना मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. तिथे आतापर्यंत ४ लाख २० हजार २८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे लसीकरण तातडीने सुरू करण्यात आले.

चीनच्या सायनोव्हॅक कंपनीने तयार केलेल्या कोरोना व्हॅक लसद्वारे लसीकरण करण्याचा निर्णय झाला. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा करण्यात सायनोव्हॅक कंपनीचा वेग कमी पडत आहे. यामुळे वेगाने लसीकरण करणे कठीण झाले आहे. या अडचणीवर उपाय म्हणून ब्राझिलने भारतातून कोविशिल्डचे दोन लाख डोस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्राझिलची लोकसंख्या २१ कोटी ३४ लाखांपेक्षा जास्त

ब्राझिलची लोकसंख्या २१ कोटी ३४ लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे वेगाने मृत्यू होत असल्यामुळे ब्राझिल सरकारने लसीकरण मोहीम तातडीने राबण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या सायनोव्हॅक कंपनीने ब्राझिलमधील प्रकल्पात लसचे ६० लाख डोस तयार केले आहेत. पण ब्राझिल सरकारने पहिल्या टप्प्यात सुमारे पाच कोटी नागरिकांना लस देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारी मागणीपेक्षा कमी लस उपलब्ध असल्यामुळे ब्राझिल सरकारने भारतातून तातडीने कोविशिल्डचे दोन लाख डोस मागवले आहेत.

कोविशिल्डचे १० कोटी आणि चीनच्या कंपनीच्या लसचे ५ कोटी डोस

कोविशिल्डचे १० कोटी आणि चीनच्या कंपनीच्या लसचे ५ कोटी डोस यांच्या माध्यमातून ब्राझिल देशात लसीकरण करणार आहे. नंतर लस व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन दिली जाईल. नागरिक खुल्या बाजारातून खरेदी करुन डॉक्टरांकडून लस टोचून घेतील. ब्राझिलची मागणी पूर्ण करण्यासाठी पुण्यातून सिरमने तातडीने २ लाख डोस रवाना केले आहेत. ही लसची पहिली खेप आहे. आणखी पुरवठा लवकरच होणार आहे.

भारत मदत म्हणून ६ देशांना देतोय कोरोनाची लस

ब्राझिलला CoviShild निर्यात करण्याव्यतिरिक्त भारताने मदत म्हणून भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स या सहा देशांना कोरोना लसचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी काही देश भारताच्या संपर्कात आहेत. लवकरच या देशांना कोरोना लसचा पुरवठा करण्याबाबत भारत सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या देशांच्या नियामक यंत्रणेकडून लवकरच भारताला कोरोना लससाठी आवश्यक ती परवानगी मिळेल. यानंतर या तीन देशांसाठी कोरोना लसच्या पुरवठ्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

ओमान ची T 20 World Cup आयोजनाची तयारी

Web News Wala

EMI Moratorium वर तारीख पे तारिख

Team webnewswala

टाटा सन्स खरेदी करणार Air Asia चे ३२.६७ टक्के शेअर्स

Web News Wala

Leave a Reply