Team WebNewsWala
राष्ट्रीय

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर

एका महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ ही १२ वी वाढ आहे. पेट्रोल १७ पैशांनी तर डिझेल २९ पैशांनी महागलं आहे. 

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर

Webnewswala Online Team

संपूर्ण देश करोना संकटाचा सामना करत असाताना सामान्यांना महागाईचा देखील फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. एका महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ ही १२ वी वाढ आहे. पेट्रोल १७ पैशांनी तर डिझेल २९ पैशांनी महागलं आहे.  दिल्लीत रविवारी डिझेलची किंमत ८४ रुपये प्रतिलिटर इतकी नोंदवली गेली. तर मुंबईत पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

एका महिन्यात १२ वी वाढ

पेट्रोलचे दर गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९३.२१ रुपये इतका आहे. तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ८४.०७ रुपये इतकी आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. मुंबईतही पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९९.४९ रुपये आणि डिझेल प्रतिलिटर ९१.३० रुपये इतकं आहे.

पेट्रोलची उच्चांकी किंमत राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यात

देशात पेट्रोलची उच्चांकी किंमत राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यात नोंदवली गेली आहे. या जिल्ह्यात पेट्रोलसाठी प्रतिलिटर १०४.१८ रुपये, तर डिझेलसाठी ९६.९१ रुपये मोजावे लागत आहेत. व्हॅट आणि मालवाहतूक शुल्कानुसार वेगवेगळ्या राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे असतात. राजस्थानमध्ये सर्वाधिक व्हॅट आकारला जातो. त्यानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही सर्वाधिक व्हॅट आहे.

निवडणूक संपताच पेपेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरावर तेल कंपन्या १५ दिवसांनी दर ठरवत असतात. मागील काही दिवसात विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता. मात्र निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकल्या आहेत. इंधनाचे दर वाढत असल्याने सामान्य नागरिकांना फटका बसत आहे.

Title – पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर ( Increase in petrol and diesel prices; On the threshold of 100 petrol in Mumbai )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

पवई IIT चा ‘बोधीट्री’ आता सर्वांना उपलब्ध

Team webnewswala

लवकरच १०० सरकारी कंपन्या विकण्याची मोदी सरकार ची तयारी

Web News Wala

महाराष्ट्राचा राम साकारणार अयोध्येतील रामाची मुर्ती

Team webnewswala

Leave a Reply