Team WebNewsWala
तंत्रज्ञान राष्ट्रीय

पहिल्याच दिवशी Income Tax ची Website Crash

Income Tax विभागानं सोमवारी रात्री या वेबसाईटचं लाँचिंग केलं. मात्र, पहिल्याचं दिवशी Website Crash असल्यानं करदात्यांनी संताप व्यक्त केला.

पहिल्याच दिवशी Income Tax ची Website Crash

Webnewswala Online Team – Income Tax नं नवी वेबसाईट 7 जूनला लाँच केली. इन्कम टॅक्स विभागानं सोमवारी रात्री या वेबसाईटचं लाँचिंग केलं. आयटीआर फाईल करणे, इन्कम टॅक्स रिटर्न प्रक्रिया सोपी आणि जलद बनवण्यासाठी नवीन पोर्टल लाँच करण्यात आलं मात्र, पहिल्याचं दिवशी Website Crash असल्यानं करदात्यांनी संताप व्यक्त केला. पहिल्याच दिवशी Website Crash झाल्यानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ट्विटद्वारे इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांच्याकडे संताप व्यक्त करत उत्तर मागितलं आहे.

निर्मला सीतारमण यांचा संताप

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नवीन पोर्टल डाऊन झाल्याबद्दल संताप व्यक्त करत इन्फोसिसला जाब विचारला आहे. बहुप्रतिक्षित ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 20.45 वाजता लाँच केलं आहे. नव्या पोर्टलबद्दल अनेक अडचणी समरो आल्या आहेत. इन्फोसिस आणि नंदन निलेकणी तुमच्याकडून दिली जाणारी सेवा गुणवत्तापूर्ण असेल. तुम्ही आमच्या करदात्यांना निराश करणार नाही, अशी आशा देखील सीतारमण यांनी व्यक्त केली.

नव्या वेबसाईटची जबाबदारी इन्फोसिसकडे

इन्कम टॅक्स विभागानं नव्या पोर्टलच्या निर्मितीची आणि त्याच्या देखभालीची जबाबादारी इन्फोसिस कंपनीला दिली आहे. त्यामुळे वेबसाईटमध्ये आल्या त्रुटी दूर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी नंदन निलेकणि यांना लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.

पोर्टल लाँचिगला उशीर

इन्कम टँक्स विभागानं यापूर्वी नवीन पोर्टल 7 जूनला सकाळी लाँच करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे पोर्टल 7 जूनला रात्री लाँच करण्यात आलं. पोर्टल लाँच झाल्यानंतरही ग्राहकांना अडचणीला सामोरं जावं लागलं आहे. इन्कम टॅक्स विभागाचं जून पोर्टल 1 ते 6 जून दरम्यान बंद ठेवण्यात आलं होतं.

Web Title – पहिल्याच दिवशी Income Tax ची Website Crash ( Income tax department new portal crash on first day  )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भारतीय रेल्वेने केला तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये बदल

Team webnewswala

संपणार लसींचे टेन्शन, जून महिन्यात 12 कोटी लस

Web News Wala

WhatsApp वरून तुमच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं समोर

Team webnewswala

1 comment

पहिल्य&#236... June 9, 2021 at 8:12 pm

[…] Income Tax विभागानं सोमवारी रात्री या वेबसाईटचं लाँचिंग केलं. मात्र, पहिल्याचं दिवशी Website Crash असल्यानं करदात्यांनी संताप व्यक्त केला.  […]

Reply

Leave a Reply