Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय नोकरी व्यापार

मंदीमध्ये संधी अ‍ॅमेझॉन देणार एक लाख लोकांना रोजगार

अनेक देशात लॉकडाऊन मुळे मंदीची स्थिती निर्माण झाली पण या दिवसातही ई-कॉर्मस क्षेत्रातील कंपनी अ‍ॅमेझॉन देणार एक लाख लोकांना रोजगार

मंदीमुळे जगातील अनेक उद्योगांच कंबरड मोडलं असून मोठया प्रमाणावर नोकरकपात सुरु आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे मंदीची ही स्थिती निर्माण झाली आहे. पण या मंदीच्या दिवसातही ई-कॉर्मस क्षेत्रातील आघाडीची कंपनी अ‍ॅमेझॉन देणार एक लाख लोकांना रोजगार आहे.

Pick Pack & Deliver क्षेत्रात नोकरभरती 

अ‍ॅमेझॉन अमेरिकेत एक लाख लोकांना रोजगार देणार आहे. लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्सच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. मागच्या तिमाहीत कंपनीच्या व्यवसायात ४० टक्के वाढ झाली. जगातील सर्वात मोठा रिटेलर असणाऱ्या अ‍ॅमेझॉन मागच्या २६ वर्षातील इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ आहे. पीक, पॅक आणि उत्पादन ग्राहकांच्या दरवाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अ‍ॅमेझॉन नोकरभरती करणार आहे.

वाढत्या व्यवसायामुळे कर्मचारी भरती ही कंपनीची गरज आहे. अमेरिका आणि कॅनडात पूर्णवेळ तसेच अर्धवेळ कामासाठी ही कर्मचारी भरती केली जाणार आहे. टेक्नोलॉजी आणि कॉर्पोरेटसाठी ३३ हजार जागा रिक्त असल्याचे अ‍ॅमेझॉनने या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले होते. मार्च महिन्यात कंपनीने १ लाख जागा रिक्त असल्याचे जाहीर केले होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पश्चिम रेल्वेवर आणखी ४ महिला विशेष लोकल

Team webnewswala

फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंग सुविधा

Team webnewswala

तंबाखूपासून कोरोना लस, लवकरच होणार मानवी ट्रायल

Team webnewswala

Leave a Reply