Team WebNewsWala
आरोग्य राष्ट्रीय समाजकारण

राजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच होणार साजरी

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व करोनाबाधितांच्या आरोग्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यंदा फटाक्यांचा वापर न करता राजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच साजरी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

राजस्थान : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व करोनाबाधितांच्या आरोग्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यंदा फटाक्यांचा वापर न करता राजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच साजरी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आलेली असताना राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये फटक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये दिवाळी फटाक्यांविनाच साजरी करण्याचे आवाहन

“फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूपासून करोनाबाधित रुग्ण आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी, राज्यात फटक्यांची विक्री आणि आतिषबाजीवर बंदी घालण्याचे, तसेच फिटनेस प्रमाणपत्र नसलेली व धूर सोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. असं ट्विट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलं आहे.”

नेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट सुरू 

जर्मनी, यूके, फ्रांस, इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये करोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. काही देशांना तर पुन्हा लॉकडाउन सुरू करावा लागला आहे. आपल्याकडे देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. असंही गेहलोत यांनी सांगितलं आहे.

 

जगभरासह देशभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. देशात मागील २४ तासांमध्ये ४५ हजार २३० नवे करोनाबाधित आढळले असून, ४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८२ लाख २९ हजार ३१३ वर पोहचली आहे. करोना संसर्गाचा वेग जरी काहीसा मंदावला असला तरी देखील कराना रुग्ण संख्येत व मृतांच्या संख्येत भर पडतच आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पहिल्याच दिवशी Income Tax ची Website Crash

Web News Wala

बहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम

Web News Wala

Loan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा

Team webnewswala

Leave a Reply