Team WebNewsWala
आरोग्य क्राईम राजकारण राष्ट्रीय समाजकारण

हिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा

ट्विटर वरुन आमीर खान चा व्हिडिओ शेअर करत मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हान बाबा रामदेव यांनी दिले

‘मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा’

Webnewswala Online Team – ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्‍टरांवर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरू आणि व्यावसायिक रामदेव बाबा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी 15 दिवसांत माफी मागावी अथवा एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या नोटिसीत केली आहे.

तर दुसरीकडे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. आता, बाबा रामदेव यांनी अभिनेता आमीर खान लाही या वादात ओढून घेतलं आहे. त्यामुळे, हा वाद आणखीनच चर्चेचा विषय बनला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खान चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव यांनी दिले आहे.

शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये आमीरने देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये, वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप या व्हिडिओत केला आहे. या व्हिडियोवरून त्यांनी मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच दिल आहे.

दरम्यान, आमचे रामदेवबाबांशी व्यक्‍तिगत शत्रुत्व नाही. त्यांनी ऍलोपॅथी आणि आधुनिक उपचार पद्धतीविषयीची आपली आक्षेपार्ह विधाने मागे घेतली तर त्यांच्या विरोधातील पोलीस तक्रारही आम्ही मागे घेऊ.

डॉ. जे. ए. जयलाल – इंडियन मेडिकल असोसिएशन 

Web Title – ‘मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा’ ( If you have the courage, take out a morcha against Aamir Khan )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

OTT Platform साठी मार्गदर्शक तत्वांऐकजी कायदा करा : सर्वोच्च न्यायालय

Web News Wala

सोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर

Web News Wala

भिवंडी पालिकेचा अजब कारभार कोट्यवधींच्या घंटागाड्या धुळीत

Web News Wala

Leave a Reply