Team WebNewsWala
शहर शिक्षण

‘IDOL’ प्रवेशास १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

विद्यापीठाच्या IDOL च्या जानेवारी सत्राच्या प्रवेशास १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून आतापर्यंत 2577 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले
‘IDOL’ प्रवेशास १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (IDOL) जानेवारी सत्राच्या प्रवेशास १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून आतापर्यंत जानेवारी सत्रात दोन हजार ५७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

करोनमुळे जुलै सत्राची प्रवेश प्रक्रिया डिसेंबपर्यंत

विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२० मध्ये मुंबई विद्यापीठास जानेवारी सत्राच्या प्रवेशास मान्यता दिली होती. त्यानुसार गेल्या वर्षी जानेवारी सत्रात प्रथमच ९०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा करोनमुळे जुलै सत्राची प्रवेश प्रक्रिया डिसेंबपर्यंत लांबली. सध्या २०२१च्या जानेवारी सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या सत्रात कला, वाणिज्य पदवी आणि पदव्युत्तर, शिक्षणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. पदव्युत्तर कला अभ्यासक्रमांमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून मानव्य व सामाजिकशास्त्रमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व समाजशास्त्र या विषयांसाठी प्रवेश घेता येईल. वाणिज्य पदव्युत्तर अभ्यासक्रमालाही लेखापरीक्षण आणि व्यवस्थापन असे दोन विषय उपलब्ध आहेत.

IDOL मध्ये यंदापासून अभ्यासक्रमासाठी सत्र पद्धत सुरू

IDOL मध्ये यंदापासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सत्र पद्धत सुरू होत आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू असून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर अर्ज आणि माहिती उपलब्ध होईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

प्रगतिशील शेतकऱ्यांकडून ऑर्किड लागवडीचा प्रयोग यशस्वी

Team webnewswala

वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट’ साठी प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री भेट

Web News Wala

लोटे एमआयडीसी मध्ये आगीचे सत्र सुरूच M R Farma कंपनीत आग

Web News Wala

Leave a Reply