Team WebNewsWala
Other क्राईम राष्ट्रीय

IAS ऐश्वर्या शेरॉन फेक अकाउंट्समुळे त्रस्त पोलिसांकडे तक्रार

IAS Aishwarya Shyorana complains to police about fake accounts

नागरी सेवा परीक्षेत (UPSC) ९३ वा क्रमांक पटकावून चर्चेत आलेली प्रसिद्ध मॉडेल IAS ऐश्वर्या शेरॉन सध्या फेक इन्स्टाग्राम अकाउंट्स मुळे त्रस्त आहे. तिने या फेक अकाउंट्स विरोधात कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सध्या सायबर पोलीस विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

ऐश्वर्या शेरॉन एक प्रसिद्ध मॉडेल आहे. २०१६ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत फाइनलिस्ट ठरलेल्या या सौंदर्यवतीने UPSC परिक्षेत बाजी मारुन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.

या कामगिरीसाठी सोशल मीडियाद्वारे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला गेला. पण लक्षवेधी बाब म्हणजे तिचं हे कौतुक काही फेक अकाउंट्सवर केलं जात आहे. IAS ऐश्वर्या शेरॉन चर्चेत येताच जवळपास २० खोटी इन्स्टाग्राम अकाउंट्स तिच्या नावाने सुरु करण्यात आली.

नक्की वाचा >>
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
जॉन सीनाने शेअर केला ऐश्वर्याचा फोटो, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
Tik Tok ला पर्याय Instagram Reels
Tik Tok वरील लोकप्रियता महागात, दोन वर्षांचा कारावास 14 लाखांचा दंड

या अकाउंटवर तिचे फोटो आणि व्हिडीओजदेखील पोस्ट करण्यात आले. या अकाउंट्सला खरं मानून काही तासांत हजारो चाहत्यांनी त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली. या खोट्या अकाउंट्सला बंद करण्यासाठी ऐश्वर्याने आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

UPSC परिक्षेत महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नक्की काय आहे शिवनागम मुळी म्हणुन पहिला जाणारा व्हिडिओ

Team webnewswala

खासदार रविकिशन यांना आता Y + Security

Team webnewswala

पुण्यात अष्टविनायक गणपती मंडळातर्फे सेवा उत्सव

Team webnewswala

4 comments

Leave a Reply