Team WebNewsWala
ऑटो पर्यावरण

लवकरच लाँच होऊ शकते Hyundai Nexo Hydrogen Car

देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमुळे खिशावर ताण पडत आहे. लवकरच Hyundai Nexo Hydrogen Car मध्ये प्रवास करण्याची संधी मिळू शकते.

लवकरच लाँच होऊ शकते Hyundai Nexo Hydrogen Car

Hyundai Nexo Hydrogen Car सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमुळे खिशावर ताण पडत आहे. परंतु लवकरच देशात एका नव्या प्रकारच्या कारमध्ये प्रवास करण्याची संधी मिळू शकते. दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Hyundai ला आपल्या नव्या फ्युअल सेल इलेक्ट्रिक एसयूव्ही Nexo साठी मंजुरी मिळाली आहे. याव्यतिरिक्त लवकरत ही कार भारतीय बाजारपेठेतही लाँच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Hyundai Nexo Hydrogen Car यावर्षी भारतीय बाजारपेठेत

परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जर ही कार लाँच झाली तर ही देशातील पहिली हायड्रोजन पॉवर्ड कार असेल. कंपनीनं आपली ही फ्युअल सेल इलेक्ट्रिक एसयूव्ही गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केली होती. मोबिलिटीचा हा सर्वात उत्तम पर्याय असल्याचंही कंपनीनं म्हटलं होतं.
Hyundai Nexo मध्ये कंपनीनं 95kW क्षमतेच्या फ्युअल सेल आणि 40kW क्षमतेच्या बॅटरी पॅकचा वापर केला आहे. यामध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर कारला पॉवर देते. ते जवळपास 161bhp ची पॉवर आणि 395Nm चा टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये हायड्रोजनचे तीन टँक देण्यात आले असून या माध्यमातून ही कार 666 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.

स्पीड आणि ड्रायव्हिंग रेंज

या कारचे हायड्रोजन टँक पाच मिनिटांच्या आत रिफिल केले जाऊ शकतात. फ्युअल सेल कोणत्याही प्रकारच्या वातावरणात उत्तमरित्या काम करू शकतात असा दावा कंपनीनं केला आहे. या कारचा टॉप स्पीड 179 किलोमीटर प्रति तास इतका आहे.

फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर एसयूव्ही हायवे ड्रायव्हिंग असिस्ट, लेन फॉलोविंग असिस्ट, रिमोट पार्किंग असे फीचर्स यात देण्यात आले आहेत. याशिवाय ही एसयूव्ही दोन इंटिरिअर कलर्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मेट्योर ब्ल्यू आणि ड्युअल टोन स्टोन आणि शेल ग्रे कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. याशिवाय यात 12.3 इंचाचा LCD स्क्रिनदेखील देण्यात आला आहे. ही एसयूव्ही भारतात लाँच करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Toyota Mirai ही जगातील पहिली हायड्रोजन कार

Toyota Mirai ही जगातील पहिली हायड्रोजन फ्युअल सेल कार आहे. याची विक्री कमर्शिअली 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पुण्याच्या वाघाटींना मानवली मुंबई, महिनाभरात वजन वाढले दुपटीने

Team webnewswala

जगप्रसिद्ध हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार

Team webnewswala

भारतात पहिल्यांदाच हींग शेतीचा प्रयोग

Team webnewswala

Leave a Reply