Team WebNewsWala
सिनेमा

“हंगामा 2′ देखील होणार OTT वर रिलीज

"हंगामा 2' देखील होणार OTT वर रिलीज होणार आहे. Disney + आणि Hotstar ला या सिनेमाचे हक्क 30 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामध्ये सॅटेलाइट हक्कांचा समावेश नाही.

“हंगामा 2′ देखील होणार OTT वर रिलीज 

Webnewswala Online Team – कोरोनाच्या साथीमुळे सगळे सिनेमे OTT वर रिलीज व्हायला लागले आहेत.  आता “हंगामा 2′ देखील होणार OTT वर रिलीज होणार आहे. Disney + आणि Hotstar ला या सिनेमाचे हक्क 30 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामध्ये सॅटेलाइट हक्कांचा समावेश नाही. याशिवाय टीव्ही प्रिमियरच्या हक्कांची एकूण रक्कम समजू शकलेली नाही.

ही रक्कम अंदाजे 36 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. ‘हंगामा 2′ OTT वर कधी रिलीज होणार हे देखील समजू शकलेले नाही. निर्मात्यांकडून अद्याप या व्यवहारावर शिक्कामोर्तब केले गेलेले नाही. ‘हंगामा 2′ एक हलकीफुलकी फिल्म आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येणार आहे.

या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल, आशुतोष राणा, मनोज जोशी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि टिकू तलसानिया यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

याशिवाय अक्षय खन्नाही छोट्या भूमिकेत दिसणार आहे. शिल्पा शेट्टी बऱ्याच दिवसांनंतर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. परेश रावल आणि शिल्पा शेट्टीची जोडी बघायला प्रेक्षकांना मजा येणार आहे.

Web Title – “हंगामा 2′ देखील होणार OTT वर रिलीज ( “Season 2” will also be released on OTT )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

आता सलमान राबविणार मुळशी पॅटर्न

Team webnewswala

सुशांतच्या चाहत्यांची दिल बेचारा ला अनोखी श्रद्धांजली

Team webnewswala

RRR मध्ये Juniour NTR चा थक्क करणारा लूक

Team webnewswala

Leave a Reply